आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (11 एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांशी भिडले. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्नशील होते. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून दोन गुण आपल्या नावे केले. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Leading from the front, the @ImRo45 way 🙌
The @mipaltan skipper becomes the Player of the Match after guiding his side to a six-wicket victory in Delhi 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/6PWNXA2Lk6 #TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/qR6K2r8vRX
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दिल्लीसाठी डेविड वॉर्नर व पृथ्वीच्या यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, शॉ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यानंतर आलेल्या मनीष पांडे याने 26 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर पियुष चावला नाही दिल्लीची मधली फळी अक्षरशा कापून काढली. अक्षर पटेलने फलंदाजीला आल्यानंतर प्रतिआक्रमण करत झटपट धावा वसूल केल्या. त्याने वॉर्नरसह संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. अक्षर व वॉर्नर यांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. जेसन बेहरेनडॉर्फच्या 19 व्या षटकात चार फलंदाज बाद झाल्याने दिल्लीची गाडी अडखळली. अखेर त्यांना 172 धावांवर समाधान मानावे लागले.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी 7.3 षटकात 71 धावांची सलामी दिली. ईशान धावबाद झाल्यानंतर रोहितने आपली खेळी तशीच पुढे नेली. त्याने आपल्या खेळीचे रूपांतर अर्धशतकात करताना संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याला तिलक वर्माने 41 धावा करत साथ दिली. मात्र, तिलक रोहित व सूर्यकुमार हे काही चेंडूंच्या अंतराने परतल्याने दिल्लीने सामन्यात पुनरागमन केले. मात्र, टीम डेव्हिड व ग्रीन यांनी आपला संयम राखला. अखेरच्या षटकात पाच धावांची गरज असताना त्यांनी अखेरच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला.
(IPL 2023 Mumbai Indians Beat Delhi Capitals By 6 Wickets Rohit Chawla Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला