– अनिल भोईर
आयपीएलच्या साखळी सामन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून 6 सामने शिल्लक आहेत. मात्र आतापर्यत केवळ 1 संघ अधिकृतपणे प्ले-ऑफ्समध्ये दाखल झाला आहे. तर उर्वरित 3 जागांसाठी 7 संघाच्या मध्ये चुरस रंगलीये.
गुजरात टायटन्स- गुजरात टायटन्स संघाने 18 गुणांच्या सह टॉप 2 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
उर्वरित सामना- आरसीबी
चेन्नई सुपर किंग्स- सीएसकेचा एक सामना शिल्लक असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणारा हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. पराभव झाल्यास त्याना प्ले-ऑफससाठी पात्र होण्यासाठी लखनऊ, मुंबई व आरसीबीपैकी किमान एका संघाचा 1 पराभव होणे आवश्यक असेल.
उर्वरित सामना- दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स- मुंबई इंडियन्स संघाला शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यासोबत लखनऊ, आरसीबी व लखनऊ संघापैकी किमान 1 संघाचा पराभव होणे आवश्यक असेल.
उर्वरित सामने- सनरायझर्स हैदराबाद
लखनऊ सुपरजायंट्स- लखनऊ सुपरजायंट्स संघाला उर्वरित सामना जिंकून थेट प्ले-ऑफ्समध्ये जाता येईल. मात्र पराभव झाल्यास 15 गुणांवर पात्र होण्यासाठी आरसीबी, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स या संघापैकी एका संघाचा 1 पराभव होणे आवश्यक असेल.
उर्वरित सामने – केकेआर
आरसीबी- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकून 16 गुणांवर जाणे अनिवार्य आहे. 16 गुणांवर नेट रनरेटच्या आधारे पात्र होण्याची शक्यता आहे किंवा सीएसके, मुंबई इंडियन्स व लखनऊ या संघापैकी किमान एका संघाचा 1 पराभव झाल्यास 16 गुणांवर पात्र होतील.
उर्वरित सामने- सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स
पंजाब किंग्स- पंजाब किंग्स संघाला उर्वरित सामना मोठ्या फरकाने जिंकून आणि मुंबई इंडियन्स, आरसीबी हे संघ उर्वरित सामने पराभूत झाल्यास पात्र होतील.
उर्वरित सामने- राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स- राजस्थान रॉयल्स संघाला उर्वरित सामना जिंकून आणि मुंबई इंडियन्स, आरसीबी व केकेआर हे संघ उर्वरित सामने पराभूत झाल्यास पात्र होतील.
उर्वरित सामने- पंजाब किंग्स
केकेआर- कोलकाता नाइट रायडर्स संघाला उर्वरित सामन मोठ्या फरकाने जिंकून आणि मुंबई, आरसीबी, राजस्थान हे संघ उर्वरित सामने पराभूत झाल्यास तसेच पंजाबपेक्षा चांगला नेट रनरेट ठेवल्यास पात्र होतील.
उर्वरित सामने- लखनऊ
(IPL 2023 Play Offs Equation Before Remaining 6 Matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ






