इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये रविवारी (14 मे) दोन सामने खेळवले जाणार आहेत. राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर बेंगलोर लढत सुरू आहे. त्यानंतर रात्री 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकता नाईट रायडर्स संघात सामना रंगेल. प्लेऑमध्ये कोण जाईल हे या सामन्यातून ठरेल. चला तर पाहूयात की, प्ले-ऑफसाठी कोणता संघ पात्र आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, नऊ संघ अद्याप आयपीएल 2023 प्ले-ऑफमध्ये (Indian Premier League 2023 Play-off) जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. रविवारच्या सामन्यांच्या विजय आणि पराजयामुळे काय परिणम होऊ शकतात त्यावर एक नजर टाकूयात.
राजस्थान वि. बेंगलोर
उभय संघातील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दुपारी खेळला जात आहे. तसेच, या सामन्यातील विजेता प्ले-ऑफच्या दिशेने झेप घेईल. जर आजचा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जिंकला, तर तो संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर जाईल. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challenger Bangalore) संघाने आजचा सामना आपल्या नावावर केला, तर कुठेतरी प्ले-ऑफमध्ये जाण्याची संधी प्राप्त होईल. पुढे जाऊन बेंगलोरकडे आणखी दोन मॅच खेळण्याची असतील. मात्र, आजच्या आणि पुढील दोन सामन्यांमध्ये बेंगलोरला विजय मिळवावाच लागेल अन्यथा संघ प्ले-ऑफपासून लांब राहील.
चेन्नई वि. कोलकाता
चेन्नई वि. कोलकाता सामन्यादरम्यान, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ पूर्णपणे सामना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल. कारण, या सामन्यानंतरच प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होईल. आज चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला हरवले, तर विजय त्यांना आयपीएलच्या टेबलच्या शिखरावर घेऊन जाईल यात कोणतीही शंका नाही. त्यांचे सध्या 12 सामन्यांनतर 15 गुण आहेत. तसेच, आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्सपेक्षा एक गुण मागे आहेत. केकेआरने आत्तापर्यंत 12 सामने खेळले असून गुणतालिकेतील त्यांचे गुण हे 10 आहेत. अशात केकेआर सीएसकेला हरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. मात्र, ही लढत पाहण्याजोगी असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा
बेंगलोरसाठी फाफ बनला ‘रनमशीन’, 24 धावांचा टप्पा पार करताच नावावर केला IPL 2023मधील खास विक्रम