---Advertisement---

निम्मी आयपीएल संपली, Points Tableमध्ये धोनीच्या चेन्नईचा जलवा, ‘या’ 3 संघांसाठी प्ले-ऑफची वाट खडतर

On: बुधवार, एप्रिल 26, 2023 1:06 PM
Chennai-Super-Kings
---Advertisement---

देशात सुरू असलेल्या आयपीएल 2023 हंगामाला क्रिकेटप्रेमींकडून भरभरून प्रेम मिळतंय. या हंगामात एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी अर्धे म्हणजेच 35 सामने खेळले गेले आहेत. सर्व संघांना साखळी फेरीत प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत. मंगळवारी (दि. 25 एप्रिल) गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघातील सामन्यानंतर प्रत्येक संघाचे प्रत्येकी 7 सामने खेळून झाले आहेत. आतापर्यंत ही स्पर्धा खूपच रोमांचक ठरली आहे. अव्वल 6 किंवा 7 संघांबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्याबाबत असे वाटत नाही की, त्यांना प्ले-ऑफमध्ये जाण्यात काही अडचण येईल. म्हणजेच, यावेळी आपल्याला शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्ले-ऑफसाठीच्या 4 संघांची प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्या गुणतालिकेवर नजर टाकूयात. इथे चेन्नई सुपर किंग्स संघ अव्वलस्थानी आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Channei Super Kings) संघ आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आतापर्यंत शानदार कामगिरी करत पुढे आले आहेत. दोघांनीही प्रत्येकी 7 सामने खेळून 5 विजयांसह 10 गुण मिळवले आहेत. मात्र, चेन्नईचा नेट रनरेट (0.662) हा गुजरातच्या नेट रनरेटपेक्षा (0.580) चांगला आहे. त्यामुळे धोनीचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ हंगामात खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. दिल्ली 10व्या, तर हैदराबाद 9व्या स्थानी आहे. दिल्लीला सुरुवातीच्या पाच पराभवानंतर 2 सामन्यात विजय मिळवता आला, पण मजबूत मानल्या जात असलेल्या हैदराबाद संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये.

आयपीएल 2023 गुणतालिका
आयपीएल 2023 गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर चेन्नई अव्वलस्थानी आहे, तर गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये काट्याची टक्कर सुरू आहे. या चारही संघांनी 7 सामने खेळून 4 विजय मिळवले आहेत. या चारही संघांचे 8 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या आधारे राजस्थान तिसऱ्या, लखनऊ चौथ्या, बेंगलोर पाचव्या आणि पंजाब सहाव्या स्थानी आहे.

दुसरीकडे, पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. ते 7 पैकी 3 विजयांसह 6 गुण मिळवत सातव्या स्थानी आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे हालदेखील दिल्ली आणि हैदराबादसारखेच आहे. संघ 4 गुणांसह 8व्या स्थानी आहे. असेच काहीसे हैदराबादचे आहे. ते 4 गुणासंह नवव्या स्थानी आहे, तर दिल्ली 4 गुणांसह दहाव्या स्थानी आहे.

प्लेऑफचे समीकरण
तसं पाहिलं, तर स्पर्धेत आणखी बरेच सामने बाकी आहेत. प्रत्येक संघाला अजून त्यांचे 7 सामने खेळायचे आहेत. विशेष म्हणजे, यावेळी असा कोणताच संघ नाहीये, जो सलग जिंकला आहे किंवा पराभूत झाला आहे. म्हणजेच, सामन्यांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. अशात असे म्हणणेदेखील कठीण आहे की, एखादा संघ कमकुवत आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिली, तर कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीची स्थिती खूपच खराब दिसत आहे. नेहमी आयपीएल प्ले-ऑफमध्ये तेच संघ जातात, जे कमीत कमी अर्धे म्हणजेच, यावेळच्या नियमानुसार 7 सामने जिंकतात. मात्र, या तिन्ही संघांनी पहिल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात पराभत पत्करले आहेत. त्यामुळे हे समीकरण पूर्ण करण्यासाठी या तिन्ही संघांना उरलेल्या 7 सामन्यांपैकी कमीत कमी 5 सामने जिंकावे लागतील. आता हे संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl 2023 points table csk on top playoff scenario after first half ends know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूंना पहिलं बाहेर काढा, मुंबईच्या कामगिरीवर गावसकरांचे परखड मत; रोहितला ब्रेक घेण्याचा सल्ला
‘…तर जागा मिळालीच नसती’, WTC फायनलमध्ये रहाणेची निवड होताच इरफान पठाणचे खळबळजनक भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---