इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा किताब 4 वेळा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023च्या हंगामातील चौथा विजय सनरायझर्स हैदराबादविरुद्ध साकारला. एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईने हंगामातील 29व्या सामन्यात हैदराबादला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासह चेन्नई संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. दुसरीकडे, हैदराबादसाठी सध्या काहीच योग्य घडताना दिसत नाहीये. विशेष म्हणजे, कर्णधार एडेन मार्करम याच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ चौथ्या पराभवासह गुणतालिकेत नवव्या स्थानी पोहोचला आहे.
पराभवानंतर काय म्हणाला मार्करम?
चेन्नईविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत होताच एडेन मार्करम (Aiden Markram) हा निराश झाला. त्याने या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडत म्हटले की, “ही 130 धावांची खेळपट्टी नव्हती. आम्ही कोणतीही भागीदारी केली नाही. आम्ही 160च्या आसपास धावा केल्या असत्या, तर सामना करू शकलो असतो.”
मार्करम म्हणाला की, “पुन्हा निराश झालो आहे, पराभूत होणे कधीच चांगले वाटत नाही. बॅटमधून आम्ही चांगली कामगिरी केली नाही. आमचे फलंदाज भागीदारी करू शकले नाहीत. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही चांगली धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करत राहता. आम्ही निश्चितच विचार केला होता की, ही खेळपट्टी 130 धावांची नाहीये. ही जवळपास 160 किंवा त्याहून अधिक धावांची खेळपट्टी होती. आम्ही फक्त भागीदारीच करू शकलो नाही, तर आम्ही धावांची गतीही वाढवू शकलो नाही आणि त्यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्याचे श्रेय त्यांना जाते.”
पुढे बोलताना मार्करम म्हणाला की, “आम्हाला माहिती होते की, चेन्नईचे फिरकीपटू या खेळपट्टीवर मोठी भूमिका बजावतील. प्रत्येक व्यक्तीकडे सामना करण्याची योजना आहे. तुम्ही त्यांच्याविरुद्ध मोठे फटके मारू शकता, किंवा स्ट्राईक बदलू शकता. तसेच, भागीदारीही करू शकता. आमच्याकडे योजना होती, पण दुर्दैवाने आम्ही त्या योग्यरीत्या अंमलात आणू शकलो नाही. ही पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना भिडण्याबाबत आहे. आम्ही आमच्या आक्रमक खेळावर टिकून राहण्याची गरज आहे. आम्हाला संघाच्या आत पाहावे लागेल आणि विचार करावा लागेल की, कशाप्रकारे चांगली कामगिरी केली जाऊ शकते. एक किंवा दोन व्यक्तींना बॅटवरून हात वर करण्याची गरज आहे. मी आमच्या गोलंदाजीने खूपच खुश आहे.”
हैदराबाद संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यात त्यांच्या वाट्याला 4 सामन्यात पराभव आला आहे. जर इथून पुढे संघाने पुनरागमन केले नाही, तर त्यांच्यासाठी हा हंगामही मागील हंगामासारखा वाईट ठरू शकतो. अशात आगामी सामन्यांमध्ये हैदराबाद संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2023 srh captain aiden markram statement after losing against chennai super kings know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं
माझ्या रे नादाला लागू नको! लाईव्ह सामन्यात जडेजाची हैदराबादी खेळाडूला खुन्नस; धोनीने केले शांत, Video