---Advertisement---

विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण

On: शुक्रवार, एप्रिल 7, 2023 1:38 PM
RCB-vs-KKR
---Advertisement---

पराभवाचा धक्का सहन करून कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या नवव्या सामन्यात उतरला होता. गुरुवारी (दि. 6 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 81 धावांनी धूळ चारत गुणतालिकेत गरुडझेप घेतली. नितीश राणा याच्या नेतृत्वातील केकेआरने आरसीबीला पराभूत करत हंगामातील पहिला-वहिला विजय मिळवला. या सामन्यानंतर एकीकडे केकेआरला गुणतालिकेत फायदा झाला, तर आरसीबीला तोटा सहन करावा लागला. चला तर, आयपीएल 2023च्या नवव्या सामन्यानंतर कसा आहे पॉइंट्स टेबल जाणून घेऊयात…

Paisa-Pani

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील पहिला विजय साकारला. खरं तर, कोलकाताला पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध 7 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता त्यांनी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. यासह त्यांनी दोन सामन्यात एक विजय आणि एक पराभव पत्करत 2 गुण मिळवले आहेत. अशाप्रकारे केकेआर आयपीएल 2023 पॉइंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) थेट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

https://twitter.com/IPL/status/1644039806731833346

या विजयानंतर नितीश राणा (Nitish Rana) याच्या केकेआर संघाचा रनरेट हा एकूण 10 संघांमध्ये सर्वाधिक झाला आहे. केकेआरचा रनरेट हा 2.056 इतका आहे. तसेच, अव्वलस्थानी दोन विजय आणि 4 गुणांसह गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सातव्या स्थानी घसरला आहे.

रनरेटही घसरला
आरसीबी संघाचेही 2 गुण आहेत. मात्र, कोलकाताकडून झालेल्या पराभवानंतर त्यांचा रनरेट खूपच घसरला आहे. त्यामुळे 2 गुण असूनही त्यांची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. पहिल्या सामन्यानंतर आरसीबाचा रनरेट 1.981 इतका होता. मात्र, या सामन्यानंतर आरसीबीचा रनरेट हा -1.256 इतका झाला आहे. बेंगलोरआधी राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी, लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानी आणि चेन्नई सुपर किंग्स सातव्या स्थानी आहे.

शार्दुल ठाकूरचे वादळ
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. दिल्ली 8व्या, मुंबई 9व्या आणि हैदराबाद सर्वात शेवटच्या स्थानी आहे. कोलकाता विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 204 धावा केल्या होत्या.

https://twitter.com/KKRiders/status/1644067710995947520

यात शार्दुल ठाकूर याने वादळी फलंदाजी करत 29 चेंडूत 68 धावा केल्या. तसेच, रहमानुल्लाह गुरबाज याने 57 धावा आणि रिंकू सिंग याने 46 धावांचे योगदान दिले. केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 123 धावाच करता आल्या. यावेळी केकेआरकडून वरुण चक्रवर्ती याने 4 षटकात 15 धावा खर्च करून 4 विकेट्स काढल्या. तसेच, पदार्पणवीर सुयश शर्मा यानेही 3 षटकात 30 धावा देत 3 विकेट्सची कमाई केली. (ipl 2023 points table which team is on the top after kkr v rcb match 9)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड अलर्ट! धोनीचा विक्रम मोडत सॅमसन बनला राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज, वाढवले बीसीसीआयचे टेन्शन

शार्दुल ठाकूरने सुहानालाही पाडली भुरळ! विजयानंतर केकेआरची मालकिन म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---