इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रोमवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात प्रथम जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन उतरवतील. या सामन्यात सीएसकेने विजय मिळवला, तर तर ही त्यांची पाचवी आयपीएल ट्रॉफी असेल. दुसरीकडे गुजरातला कारकिर्दीतील दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. सामना संपल्यानंतर आयपीएलकडून बक्षीसांची अक्षरशः उधळण होईल. अनेकांना या गोष्टीची कुतूहल आहे की, विजेत्या संघाला आयपीएलकडून नक्की काय बक्षीस मिळेल. आपण याय लेखातून नेमकी हीच गोष्ट उजेडात आणणार आहोत.
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी ठरू शकतात. अशात या दोघा फलंदाजांवर देखील लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत.
आयपीएल 2023च्या विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. यांच्यातील विजेता संघ आयपीएल ट्रॉफीचा मानकरी ठरेल. या संघाला 20 कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.
आयपीएल 2023च्या उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पराभूत संघाचीही आयपीएल व्यवस्थापनाकडून निराशा होणार नाही. उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.
ऑरेंज कॅप विजेच्या खेळाडूला किती रुपये मिळणार?
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅफ दिली जाते. आयपीएल व्यवस्थापनाकडून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या फलंदाजाला 15 लाख रुपये दिले जातील.
पर्पल कॅफचा विजेता खेळाडूला किती रुपये मिळणार?
हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारा गोलंदाज पर्पल कॅपचा मानकरी ठरतो. पर्पल कॅफ विजेत्या खेळाडूलाही व्यवस्थापनाकडून 15 लाखांचे बक्षीस दिले जाईल.
सुपर स्ट्रायकर ठरणाऱ्या खेळआडूला किती रुपये मिळणार?
हंगामात सर्वत्तम स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या खेळाडूला सुपर स्ट्रायकर पुरस्कार दिला जाईल. हा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूलाही 15 लाख रुपये मिळणार आहेत.
इमर्जिंग प्लेअर पुरस्कराच्या मानकरीला किती रुपये मिळणार?
आयपीएल 2023च्या हिशोबाने 1 एप्रिल 1995 नंतर जन्मलेला खेळाडू या पुरस्कारासाठी पात्र ठरतो. सोबतच त्या खेळाडूने 5 पेक्षा कमी कसोटी आणि 20 पेक्षा कमी वनडे सामने खेळलेले पाहिजे. सोबतच आयपीएलमध्ये 25 कमी सामन्यांमध्येच तो खेळलेला पाहिजे. या सर्व अटींमध्ये पात्र ठरणारा आणि हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन करणारा खेळाडू इमर्जिंक प्लेअर ऑफ द सिजनसाठी पात्र असेल. हा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. (IPL 2023 Price Money Structure)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’