---Advertisement---

रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके पुन्हा अपयशी! शानदार विजयासह राजस्थान पुन्हा नंबर वन

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान राजस्थानने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 32 धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थान पुन्हा एकदा गुण तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.

https://twitter.com/IPL/status/1651642776461901825?t=gac6B3pfFTZejUdldNWwMA&s=19

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थानला सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 8.2 षटकात 86 धावांची सलामी दिली. बटलर 27 धावा करून बाद झाल्यानंतर जयस्वालने 77 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर ध्रुव जुरेलने 34 व देवदत्त पडिक्कलने नाबाद 27 धावा करत राजस्थानला 202 पर्यंत मजल मारून दिली. विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रथमच 200 धावांचा टप्पा पार केला गेला.

या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी संथ सुरुवात दिली. ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत संघात समावेश करण्यात आलेल्या ऍडम झंपाने या दोघांना बाद केले. त्यानंतर रविचंद्रनने अश्विनने अजिंक्य रहाणे व रायडू यांना एकाच षटकात तंबूचा रस्ता दाखवा. मोईन अलीने शिवम दुबेसह आक्रमक भागीदारी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. दुबेने 33 चेंडूत 52 धावांची खेळी केली. मात्र, डेथ ओवर्समध्ये राजस्थानने केलेल्या अचूक गोलंदाजामुळे त्यांना विजय मिळवता आला नाही.

(IPL 2023 Rajasthan Royals Beat Chennai Super Kings By 32 Runs Jaiswal Jurel Zampa Ashwin Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 1 – टाय ब्रेकर नंतर पालघर काझीरंगा रहिनोसने अतिरिक्त वेळेत मारली बाजी, पुण्याचे आव्हान संपुष्टात 
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---