---Advertisement---

अहमदाबादमध्ये सॅमसन-हेटमायरचे तुफान! गुजरातला लोळवत राजस्थान टॉपवर

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये रविवार (16 एप्रिल) दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान गुजरातला तीन गडी राखून पराभूत करत विजय संपादन केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेतील आपले पहिले स्थान कायम राखले. राजस्थानसाठी शिमरन हेटमायर विजयाचा शिल्पकार ठरला.

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच षटकात साहाला बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. साई सुदर्शन दुर्दैवीरित्या 20 धावांवर धावबाद झाला. कर्णधार हार्दिक पंड्या याने आक्रमक 28 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने 45 धावांचे योगदान दिले. अभिनव मनोहर याने 13 चेंडूत 27 धावा काढल्या. डेव्हिड मिलरने 30 चेंडूवर 46 धावांची खेळी केली. सर्वांच्या योगदानामुळे गुजरातने 177 पर्यंत मजल मारली. राजस्थानसाठी संदीप शर्मा याने दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वाल व जोस बटलर हे राजस्थानचे दोन्ही सलामीवीर केवळ चार धावा धावफलकावर असताना बाद झाले. त्यानंतर देवदत्त पडिक्कल व संजू सॅमसन यांनी संघाची धावसंख्या 47 पर्यंत नेली. पडिक्कल 26 व पराग 5 धावा करत बाद झाले‌. दोघांना राशिद खानने बाद केले. मात्र, त्यानंतर संजू सॅमसन याने राशिद खानवर हल्ला चढवत सलग तीन षटकार खेचले. संजूने 32 चेंडूंवर 60 धावांनी खेळी केली. संजू बाद झाल्यानंतर शिमरन हेटमायरने गुजरातच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याला ध्रुव जुरेलने 18 धावा करत साथ दिली. रविचंद्रन अश्विनने 3 चेंडूवर 10 धावा करत राजस्थानला विजयाच्या नजीक नेले. हेटमायरने अखेरपर्यंत नाबाद राहताना 26 चेंडूवर 56 धावा करताना राजस्थानला विजय मिळवून दिला.

(IPL 2023 Rajasthan Royals Beat Gujarat Titans By 3 Wickets Sanju Samson Shimron Hetmyer Shines)

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---