आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update 🚨@rajasthanroyals win the toss and elect to bat first against @ChennaiIPL.
Follow the match ▶️ https://t.co/wKHNy124q1 #TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/cOrRDDSaEb
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2023
गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला यापूर्वी झालेल्या सामन्यात राजस्थानने अखेरच्या षटकात पराभूत केले होते. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी चेन्नई राजस्थानच्या घरच्या मैदानावर उतरली. चेन्नई या सामन्यासाठीही आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. तर, राजस्थानने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्या जागी फिरकीपटू ऍडम झंपा याला संधी दिली. मागील दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), मथीशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षना, आकाश सिंग.
(IPL 2023 Rajasthan Royals Captain Sanju Samson Won Toss And Elected To Bat First RRvCSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड क्रिकेटमध्ये येणार भूकंप? आयपीएल संघांनी राष्ट्रीय संघ सोडण्यासाठी दिली कोट्यावधींची ऑफर? वाचा सविस्तर
मॅचविनर ठरूनही रॉयवर झाली कारवाई! सामन्यादरम्यान केलेली ती चूक भोवली