इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 32 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या युवा फलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, अखेरच्या षटकात हर्षल पटेल याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आपल्या संघाला सात धावांनी विजय मिळवून दिला.
Match 32. Royal Challengers Bangalore Won by 7 Run(s) https://t.co/lHmH28JwFm #TATAIPL #RCBvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच शाहबाज अहमद याला देखील संधीचे सोने करता आले नाही. त्यानंतर मात्र प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी अक्षरशः राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी तब्बल 127 धावा जोडल्या. प्लेसिसने 39 चेंडूवर 62 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे मॅक्सवेलने 47 चेंडूत 77 धावा करताना 6 चौकार व 4 षटकार ठोकले. हे दोघे थोड्याफार अंतराने बाद झाल्याने आरसीबीच्या धावांना ब्रेक लागला. अखेर दिनेश कार्तिक याने काही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला तितकेच यश आले नाही. अखेर आरसीबीचा डाव 189 पर्यंत मर्यादित राहिला.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. बटलर पहिल्याच षटकात बाद झाला. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी 98 धावा केल्या. पडिक्कलने 52 व जयस्वालने 47 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने 22 धावांचे योगदान दिले. शिमरन हेटमायर याला सलग दुसऱ्या सामन्यात अपयश आले. ध्रुव जुरेलने अखेरपर्यंत झुंज देत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, हर्षल पटेलने अखेरच्या षटकात योग्य नियंत्रण दाखवत संघाला विजय मिळवून दिला.
(IPL 2023 RCB Beat Rajasthan Royals By 7 Runs Harshal Patel Maxwell Faf Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
ईडन गार्डन्सवर केकेआरने जिंकली नाणेफेक, सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण