आयपीएलच्या मैदानात सोमवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना सामना झाला. आरसीबीचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला, ज्यामध्ये सीएसकेने 8 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना तोडफोट खेळी केली. मात्र, तरीही आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीला अजून एक मोठा झटका आयपीएल व्यवस्थापनाकडून बसला.
आयपीएल आचार संहिता (IPL Code of Conduct) मोडल्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) याच्या सामन्या शुल्काच्या 10% रक्कम कापली गेली आहे. विराटने देखील आपली चूक मान्य केली आहे. आयपीएलकडून सांगितले गेले आहे की, “बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सीएसकेविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विराट कोहलकडून आयपीएल आचार संहिता मोडली गेली. याच कारणास्तव त्याच्या सामना शुल्काच्या 10% रक्कम दंड स्वरूपात आकारली गेली आहे. विराटने आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.2 मधील लेवल 1 श्रेणीच्या आधारे आपली चूक मान्य केली आहे.”
.@ChennaiIPL come out on top in the mid-table clash as they beat #RCB by 8 runs in highly entertaining and run-filled #TATAIPL match. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/QZwZlNk1Tt#RCBvCSK pic.twitter.com/jlEz6KmM0V
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
विराटचा संघ पराभूत
दरम्यान, आरसीबी आणि सीएसके यांच्यातील हा सामना जबरदस्त झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम सीसकेला फलंदाजीसाठी आणंत्रित केले. सीएसकेसाठी डेवॉन कॉनवे (83) आणि शिवम दुबे (52) यांनी अर्धशतके ठोकली आणि संघाची धावसंख्या 200 पार नेली. प्रथम फलंदाजीला आलेला सीएसके संघाने 20 षटकात 6 बाद 226 धावा केल्या. प्रत्युत्तरता यजमान आरसीबी संघ फलंदाजीला आला. निर्धारित 20 षटकांमध्ये आरसीबीने 8 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली आणि 8 धावांनी पराभव स्वीकारला. फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांची खेळी व्यर्थ गेली. (Virat Kohli has been fined for breaching IPL code of conduct.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आला आणि ‘किंग’ कोहलीला बाद करून मिळवली वाहवा, कोण आहे तो?
रहाणे जोमात, फाफ कोमात! 91 मीटरचा गगनचुंबी षटकार मारताच आरसीबीच्या कॅप्टनचे पडले तोंड, पाहा व्हिडिओ