भारतीय दिग्गज विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये आपल्या जुन्या अंदाजात खेळताना दिसला आहे. विराटने चालू आयपीएल हंगामातील सातवे अर्धशतक गुरुवारी (18 मे) साकारले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक असा षटकार निघाला, ज्याची चांगलीच चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आरसीबीला हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात जिंकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. आरसीबीची सलामीवीर जोडी या सामन्याची जबरदस्त फॉर्ममध्ये दिसली. विराट कोहलीने 9व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक मोठा षटकार मारला. सोशल मीडियावर या षटकाराची चर्चा होत आहे. नितीश कुमार रेड्डीला विराटने मारलेला हा षटकार तब्बल 104 मीटर लांब गेला.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1659238940837281794
दरम्यान, विराट गुरुवारी ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहून चाहत्यांच्या डोळ्याच पारणे फिटले. त्याला संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची अपेक्षित साथही मिळाली. विराट आणि फाफ या सलामीवीर जोडीने प्लेऑफच्या सहा षटकांमध्ये 64 धावा साकारल्या. या सामन्यातील खेळीदरम्यान विराटने चालू आयपीएल हंगामातील 500 धावाही पूर्ण केल्या. आयपीएल इतिहासातील विराटचा हा सहावा हंगाम आहे, ज्यामध्ये त्याने 500 धावांचा टप्पा गाठला आहे. (103 METER SIX BY VIRAT KOHLI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वतःशीस स्पर्धा करतोय फाफ डू प्लेसिस! हंगामात 650 धावा पूर्ण, नावावर केला नवा विक्रम
सनरायझर्स हैदराबादसाठी शतक करणारा चौथा फलंदाज ठरला हेनरिक क्लासेन! अवघ्या 49 चेंडूत केली कामगिरी






