राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 2023चा 66बा सामना खेळला गेला. धरमशाला स्टेडियमवर उभय संघ एकमेकांसमोर होते. दोन्ही संघ जवळपास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. मात्र, दोन्ही शुक्रवारी (19 मे) विजय मिळवून प्लेऑफसाठीच्या आपल्या शेवटच्या आशा कायम ठेऊ इच्छित होते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने संपूर्ण हंगामात करत आला तसे यावेळीही पहिल्याच षटकात विकेट घेतली. बोल्टने पकडलेला झेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पंजाब किंग्जने या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. पंजाबने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला नाही. मात्र, राजस्थान रॉयल्सने ऍडम झम्पाच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी दिली. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्जला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कारण ठरला राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult). पंजाबच्या डावातील पहिलेच षटक बोल्ड घेऊन आला आणि त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंग याला तंबूचा रस्ता दाखवला. आपल्या षटकातील दुसरा चेंडू प्रभसिरमनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. बोल्टने मात्र चपळाईने संधी साधली. आपल्या डाव्या बाजूला डाईव्ह मारत त्याने जबरदस्त छेल पकडला आणि पंजाबला पहिला झटका दिला. बोल्डचा हा झेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WHAT. A. CATCH 🤯
Trent Boult grabs a screamer off his own bowling ⚡️⚡️
Follow the match ▶️ https://t.co/3cqivbD81R #TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/ClPMm7sMVP
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2023
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक ठोकणारा प्रभसिमरन सिंग या सामन्यात दोन चेंडूत दोन धावा करून बाद झाला. सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांमध्ये 5 बाद 187 धावा केल्या. सॅम करून जितेश शर्मा आणि एम शाहरुख खान यांनी प्रत्येकी 49, 44 आणि 41 धावा केल्या. नवदीप सैनी याने राजस्थान रॉयल्ससाठी चार षटकांमध्ये 40 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्डने 1, तर ऍडम झंम्पाने 1 विकेट घेतली. (What a Catch by Trent Boult to dismiss Prabhsimran Singh.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धरमशालेत राजस्थानने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार प्रथम फलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
“मेडल तर 15 रूपयांना विकले जाते”, बृजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंबाबत वादग्रस्त विधान