---Advertisement---

आरसीबीला धूळ चारल्यानंतर केकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये ‘चक दे इंडिया’चे वातावरण, कोच स्वतः शाहरुख

KKR
---Advertisement---

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना असला, तर क्रिकेट आणि बॉलिवूडचे मिश्रण चाहत्यांना पाहायला मिळते. बॉलिवुडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान अनेकदा आयपीएल सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असतो. शाहरुखने अगदी पहिल्या आयपीएल हंगामापासून केकेआरची मालकी आपल्याकडे ठेवली आहे. गुरुवारी (6 एप्रिल) केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. यावेळी ड्रेसिंग रूममधील वातावरण अगती ‘चक दे इंडिया’ सिनेमाप्रमाणे झाले होते.

Paisa-Pani

आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम सुरू होऊ अवघे काहीच दिवस झाले आहेत. पण चाहत्यांमधील या स्पर्धेचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुरुवारी (6 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आमना-सामना झाला. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने तब्बल 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरने सामना नावावर केल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) देखील आनंदात दिसला. त्याने मैदानात येऊन उपस्थित चाहत्यांना अभिवाद आणि खेळाडूंच्या भेटी घेतल्या. नंतर शाहरुख आपल्या संघाच्या थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला.

शाहरुखचा ‘चक दे इंडिया’ (Chak De India) सिनेमा 2007 साली आला होता. हा सिनेमा त्यावेळी सुपर हीट झाला होता. सिनेमातील शेवटचा सामन्याआधी शाहरुख भारतीय हॉकी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन महिला खेळाडूंशी चर्चा करतो. अगदी तशाच पद्धतीने शाहरुखने गुरुवारचा सामना संपल्यानंतर केकेआरच्या खेळाडूंशी चर्चा केली. केकेआरच्या अधिकतृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

https://twitter.com/KKRiders/status/1644299600147419136?s=20

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर कोलकातात नाईट रायडर्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये केकेआरने 7 बाद 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ 17.4 षटकांमध्ये 123 धावांवर सर्वबाद झाला. शार्दुल ठाकुर सामनावीर ठरला, ज्याने केकेआरसाठी 29 चेंडूत 68 धावा कुटल्या. त्याव्यतिरिक्त वरुण चक्रवर्तीने 4, तर पदार्पणाच्या सामन्यात सुयश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. (Shahrukh Khan’s message for our KKR players)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

फ्लॉवर नहीं, फायर हैं! बांगलादेशच्या पठ्ठ्याने आयर्लंडविरुद्ध रचला इतिहास, संघाचा 7 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---