बॉलिबुड अभिनेता शाहरुख खान याने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत चर्चा केली. शाहरुखचा नवीन चिंत्रपट ‘पठाण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स ही शाहरुखच्या मालकीची असून याविषयी देखील चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी विषयी विचारलेल्या प्रश्नावर त्याने एक खास उत्तर दिले.
शाहरुख खान (Shahrukh Khan) सोशल मीडियावर चाहत्यांसोबत चर्चा करत असताना त्याला एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविषयी प्रश्न विचारला गेला. “आयपीएलमध्ये जेव्हा धोनी केकेआरविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीला येतो, तेव्हा कसे वाटते?” असा प्रश्न एका चाहत्याकडून शाहरुखला विचारला गेला. यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “धोनी आमच्या संघाविरुद्ध फलंदाजीला आल्यानंतर मी खूप चिंतेत असतो.” शाहरुखचे हे उत्तर चाहत्यांनाही चांगलेच भावल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शाहरुख स्वतः देखील धोनीचा मोठा चाहता आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वोत्तम संघ राहिला आहे. सीएसकेने आतापर्यंत एकूण चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएल सामन्यांनंतर शाहुरने यापूर्वी अनेकदा असेही सांगितले आहे की, धोनी त्याचा आवडचा क्रिकेटपटू आहे. आयपीएल स्पर्धा 2008 जेव्हा सुरू झाली, तेव्हा केकेआरने धोनीला खरेदी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न देखील केले होते. मात्र, धोनी त्यांच्या हातील आला नाही.
Ha ha nervous https://t.co/HOpPh2DBjF
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
शाहरुख खान मालक असलेल्या केकेआरने आयपीएलमधील प्रदर्शन देखील चांगले राहिले आहे. केकेआरने आतापर्यंत एकूण दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले तरी मागच्या काही हंगामांमध्ये केकेआरचे प्रदर्शन सुमार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आगामी हंगामात केकेआर नवीन रणनीतीसह मैदानात उतरणार आहे. आयपीएल 2023 पूर्वी खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडणार आहे. बीसीसीआयने हा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोच्चीमध्ये आयोजित केला आहे. यामध्ये भारतीयांसह अनेक विदेशी दिग्गज सहभागी होतील. (Shah Rukh Khan is afraid of Dhoni! Said, ‘When he comes to bat against KKR…’)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यजमान पुण्याची उपांत्य फेरीत धडक – गतविजेत्या कोल्हापूर, उपविजेत्या नागपूर, मुंबईचीही आगेकूच
बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव