इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 38वा सामना शुक्रवारी (दि. 28 एप्रिल) पंजाब किंग्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाब किंग्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात लखनऊने 51 धावांनी पंजाबचा धुव्वा उडवला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी खूपच खराब गोलंदाजी प्रदर्शन केले. पंजाब संघाच्या प्लेइंग 11मध्ये पुनरागमन करणाऱ्या कागिसो रबाडा यालाही खास कामगिरी करता आली नाही. आता यावर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रबाडाने टाकले दोन नो-बॉल
सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने दोन विकेट्स नक्कीच घेतल्या. मात्र, त्याने 4 षटके गोलंदाजी करताना तब्बल 52 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने 2 नो-बॉल आणि 2 वाईड चेंडू टाकले. मोहालीच्या या मैदानावर लखनऊ सुपर किंग्स संघाचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडले होते. रबाडाने त्यांना दोन फ्री-हिट फुकटात दिले. रबाडाव्यतिरिक्त गुरनूर ब्रार यानेही दोन वेळा रेषेच्या पुढे जाऊन गोलंदाजी केली. मात्र, तो युवा खेळाडू आहे, तर रबाडासारखा अनुभवी खेळाडूने असे केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
Rabada picks up the second wicket and it's the big wicket of Kyle Mayers.
Live – https://t.co/6If1I4omN0 #TATAIPL #PBKSvLSG #IPL2023 pic.twitter.com/dYgHMcCu0u
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023
काय म्हणाले डल?
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डल (Simon Doull) यांनी शुक्रवारी सामन्यात दुसऱ्यांदा नो-बॉल टाकण्याबाबत रबाडाला चांगलेच सुनावले. 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रबाडाने लखनऊला नो-बॉल टाकून फ्री-हिट दिले. तसेच, एक अतिरिक्त धावही खर्च केली. त्यानंतर त्याने पुढील चेंडू वाईड टाकला होता आणि पुढच्या चेंडूवर एक धाव कर्च केली.
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना डल म्हणाले की, “हे अस्वीकार्य व्यवहार आहे. तू एक आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे.” पुढे बोलताना डल म्हणाले की, “तो नेहमी असे करतो. तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि योग्य चेंडूवरही तो रेषेच्या फक्त एक इंच मागे असतो.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत गोलंदजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय लखनऊच्या फलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. यावेळी लखनऊने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 257 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाला 19.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 201 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना लखनऊने 56 धावांनी नावावर केला. तसेच, गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. (ipl 2023 simon doull angry on fast bowler kagiso rabada no ball in pbks vs lsg match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या देशाने माझ्यावर…’, KKRच्या उपकारांची आठवण काढत भावूक झाला रसेल
“धोनी 100 कसोटी खेळू शकला असता पण…”, 9 वर्षांनंतर शास्त्रींचा मोठा खुलासा