---Advertisement---

‘कार्तिकसाठी ही मॅच फिनिश करणे हाताचा मळ होता, पण…’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधाराचे लक्षवेधी विधान

On: मंगळवार, एप्रिल 18, 2023 12:45 PM
Dinesh-Karthik
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (दि. 17 एप्रिल) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा धक्का बसला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरचा 8 धावांनी नजीकचा पराभव केला. एकेवेळी बेंगलोरची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, हा सामना ते सहजरीत्या जिंकतील. मात्र, चेन्नईच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स काढत सामना आपल्या बाजूने वळवला. या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने दिनेश कार्तिकबद्दल वक्तव्य केले. तो म्हणाला की, दिनेश कार्तिक हा सामना सहजरीत्या जिंकून देऊ शकला असता, पण चेन्नईची गोलंदाजी खूप चांगली होती.

खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजीची गरज होती. त्यावेळी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) बाद झाला. मात्र, त्याने यावेळी 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा कुटल्या. असे असले, तरीही तो शेवटपर्यंत टिकून सामना संपवू शकला नाही. त्यामुळे हा सामना बेंगलोरला गमवावा लागला.

फाफ डू प्लेसिसचे वक्तव्य
कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या मते, जर दिनेश कार्तिक टिकून खेळला असता, तर तो सहजरीत्या विजय मिळवून देऊ शकला असता. सामन्यानंतर फाफ म्हणाला की, “माझ्यामते आम्ही खूपच चांगली फलंदाजी केली. शेवटच्या 5 षटकात सामना संपवण्यासाठीचे वातावरण तयार होते. दिनेश कार्तिकसाठी सामना संपवणे मोठी गोष्ट नाहीये. मात्र, यावरून हेदेखील समजते की, सीएसकेची गोलंदाजी किती चांगली होती. 200 धावसंख्या इथे पार होणारी होती. शेवटी येऊन त्याला फलंदाजीत जास्त ताकद लावता आली नाही. मधल्या षटकात फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजीची गरज आहे.”

सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला 218 धावाच करता आल्या. यावेळी फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी वादळी फलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी ती पुरेशी नव्हती. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला खास खेळी करता आली नाही. (ipl 2023 skipper faf du plessis reacts on dinesh karthik match finishing ability)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉनवे-दुबेसह ‘या’ खेळाडूंचे एमएस धोनीकडून कौतुक, आरसीबीला घरच्या मैदानावर चारली पराभवाची धूळ
विराटसाठी धक्यावर धक्के! सीएसकेविरुद्ध पराभवनंतर आयपीएलकडून मोठी कारवाई, जाणून घ्या चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---