मंगळवारी (दि. 2 मे) आयपीएल 2023 स्पर्धेत खूपच रोमांचक सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेला गुजरात टायटन्स संघ वि. गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी भिडला. गुजरात विरुद्ध दिल्ली संघात झालेल्या या सामन्यात गतविजेत्या संघाला नजीकच्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने 5 धावांच्या फरकांनी गुजरातला आस्मान दाखवले. अशात सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्ध सामना गमावण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. तो म्हणाला की, “आम्ही कोणत्याही दिवशी 129 धावांचे आव्हान पार करू शकत होतो. फक्त काही विकेट्स गमावल्या आणि शेवटी राहुल तेवतियाने संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मी शेवटी पूर्ण प्रयत्न केला, पण असे होऊ शकले नाही. आम्ही मधल्या काही षटकांमध्ये मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते शक्य झाले नाही. अभिनवसाठीही हे नवीन होते आणि हे यावर अवलंबून आहे की, मी सामना कशाप्रकारे सामना संपवू शकलो नाही. ही माझी जबाबदारी आहे की, मी सामना संपवू शकलो नाही. मला जिंकवता आला पाहिजे होता.”
‘सलग गमावल्या विकेट्स’
पुढे बोलताना हार्दिक म्हणाला की, “खेळपट्टी चांगली होती, हा खेळपट्टीचा दबाव होता. त्यांनी वास्तवात चांगली गोलंदाजी केली. शेवटी राहुलने आम्हाला सामन्यात उतरवले, नाहीतर तो खूपच पुढे होता. आम्ही हा सामना यासाठी हारलो, कारण मी लय पकडू शकलो नाही.”
सामन्यात 4 षटके गोलंदाजी करून 11 धावा खर्च करत 4 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याविषयी बोलताना पंड्या म्हणाला की, “मला त्याच्यासाठी दु:ख झाले, जर तुम्ही अशाप्रकारे गोलंदाजी करता आणि संघाला 129 (130) धावांवर रोखता, तेव्हाही सामना जिंकत नाहीत, तेव्हा फलंदाजांनी निराश केले.”
“मला वाटत नाही की, खेळपट्टीने खूप काही केले आहे, पण सर्व श्रेय त्याला जाते. आता खेळ अजून बाकी आहे. आम्ही या सामन्यातून धडा घेऊन पुढे जाऊ. या गोष्टी होतच राहतात. हीच आयपीएलची सुंदरता आहे. आम्ही आतापर्यंत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहोत, पण आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे,” असेही पुढे बोलताना पंड्या म्हणाला.
https://twitter.com/IPL/status/1653465188061057024
सामन्याचा आढावा
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. यावेळी दिल्लीने अमन खानच्या 51 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 130 धावा केल्या होत्या. यावेळी गुजरातकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या कमी धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघ कर्णधार पंड्याच्या नाबाद 59 धावांच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 125 धावाच करू शकला. यावेळी खलील अहमद आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना 5 धावांनी खिशात घातला. (ipl 2023 skipper hardik pandya big statement after lose against delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझं पेट्रोल संपलेलं…’, भेदक गोलंदाजीनंतर असं का म्हणाला शमी?
ईशांतच्या लाजवाब गोलंदाजीने दिल्लीचे आव्हान जिवंत, हार्दिकच्या नाबाद अर्धशतकानंतरही गुजरात पराभूत