जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर रविवारी (दि. 7 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 52वा सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने हातातून निसटलेला सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला. हातचा सामना गमावल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, चहलने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. मात्र, अकेरच्या दोन षटकात राजस्थानने सामना गमावला. चला तर चहल नक्की काय म्हणालाय जाणून घेऊयात…
‘हा सामना आम्हाला लवकरात लवकर विसरावा लागेल’
युझवेंद्र चहल याने सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या. मात्र, संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा सामना गमावल्यानंतर चहलने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “हा सामना विसरण्यासाठी वेळ लागेल. मात्र, अद्याप आमचे 3 सामने बाकी आहेत. आम्ही त्यात तिन्ही सामन्यात विजय मिळवला, तर प्ले-ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. आम्ही जितक्या लवकर हा सामना विसरू, तितके आमच्यासाठी चांगले होईल. आमच्यासाठी तितकेच चांगले होईल. अशाप्रकारे सामना गमावल्यानंतर दु:ख होते. मात्र, हा खेळाचा भाग आहे. निश्चितच आम्ही पुनरागमन करू.”
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 214 धावांचा महाकाय डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 6 विकेट्स गमावत अखेरच्या चेंडूवर षटकार मारत 217 धावा केल्या आणि सामना 4 धावांनी गमावण्याऐवजी 4 विकेट्सने जिंकला. अखेरच्या दोन षटकात हैदराबादला विजयासाठी 41 धावा करायच्या होत्या. मात्र, 19व्या षटकात कुलदीप यादव याने 24 धावा खर्च केल्या. तसेच, अखेरच्या षटकात संदीप शर्मा याने शेवटचा चेंडू नो-बॉल टाकल्यामुळे राजस्थानने जिंकलेला सामना गमावला.
गुणतालिकेत चौथ्याच स्थानी
राजस्थान संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यातील 5 सामन्यात विजय, तर 5 सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. या 5 विजयांसह राजस्थान संघ गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. आता पुढील तीन सामन्यात राजस्थान संघ पुनरागमन करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2023 spinner yuzvendra chahal reflects on rr s hurtful loss to srh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! पाकिस्तानच्या बाहेरच होणार Asia Cup 2023? श्रीलंका अन् बांगलादेशचा भारताला पाठिंबा
“समदमध्ये मला युवा युसूफ पठाण दिसतो”, माजी प्रशिक्षकांनी उधळली नव्या फिनीशरवर स्तुतीसुमने