---Advertisement---

कर्णधार कृणाल पंड्याची जादू! लागोपाठ चेंडूंवर घेतल्या दोन मोठ्या विकेट्स

On: शनिवार, मे 13, 2023 5:16 PM
SRH vs LSG Kurnal Pandya
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (13 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने सामने होते. उभय संघांतील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे हंगामात बाहेर झाला असून कृणाल पंड्या राहिलेल्या सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. शनिवारीही कर्णधार कृणालने आपली झाप सोडली. त्याने सलग दोन चेंडूवर लखनऊसाठी दोन विकेट्स घेतल्या.

सनरायझर्स हैदराबादने आपल्या होम ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 10 षटकांमध्ये केएल हैदराबाद संघ 3 बाद 95 धावांपर्यंत मजल मारू शकला. पण हैदराबादला डावातील 13व्या षटकात दोन मोठे झटके बसले. कृणाल पंड्या या षटकात गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर कृणालने लागोपाठ दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या चेंडूवर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने याची चवळाई आणि कृणालचा फिरकी चेंडू या समिकरणामुळे हैदराबादचा कर्णधार ऐडन मार्करम तंबूत परतला. तर दुसऱ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्स त्रिफळाचीत झाला. मार्करमे 20 चेंडूत 28, तर फिलिप्स एकही धाव न करता बाद झाला.

आपल्या चार षटकांच्या कोट्यातील कृणाल पंड्याचे हे दुसरे षटक होते, ज्यामध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्च केले. हैदराबादच्या डावातील चौथ्या षटकात कृणाल पहिल्यांदा गोलंदाजीला आला होता आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. (IPL 2023 SRH vs LSG Captain Krunal Pandya, two magic stuff with ball. )

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’
मुंबईचे पाऊल पडते पुढे! चालून आलीये टॉप 2 ची संधी, वाचा सारी समीकरणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---