आयपीएल 2023 हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लीग स्टेजचे अवघे काहीच सामने शिल्लक आहेत. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशातच काही खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात युवा खेळाडू आहेतच, पण काही अनुभवी आणि वयस्कर खेळाडूही आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे तो अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, पियुष चावला आणि संदीप शर्मा यांसारख्या खेळाडंचा. या सर्वांनी चालू हंगामात युवा खेळाडूंपेक्षाही चांगले प्रदर्शन केले असून यासाठी त्यांचे कौतुक होत आहे.
आयपीएल 2023 हंगामात चमकदार कामगिरी करणारे 5 अनुभवी खेळाडू
1. अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग बनला. चालू हंगामात त्याने सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केली आहे. राहणेने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांतील 6 डावांमध्ये 224 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली असून तो मधल्या फळीत सीएसकेसाठी शानदार फलंदाजी देखील करत आहे.
2. पियुष चावला
यंदाच्या हंगामात पियुष चावला शानदार गोलंदाजी करताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 खेळणाऱ्या चावलाने जबरदस्त कमबॅक केले आहे. महत्वाची बाब म्हणजे या हंगामत चावलाने मुंबईसाठी सर्वाधिक 13 विकेट घेतल्या आहेत. तसेच, पर्पल कॅपच्या शर्यतीत चापला अजून कायम आहे. आयपीएलमध्ये अनेक नवे गोलंदाज अपयशी ठरत असताना चापला मात्र कौतुकाचा धनी ठरत आहे.
3. संदीप शर्मा
आयपीएल 2023 मध्येही संदीप शर्माने आपला दबदबा कायम ठेवला आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कारण, या हंगामात तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. संदीपने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 7 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. 25 धावा खर्च करून 2 बळी, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
4. अमित मिश्रा
लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू अमित मिश्रा गेल्या काही हंगामांमध्ये अनसोड्ल राहिला होता. मात्र, आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात त्याला लखनऊने खरेदी केले. आयपीएल 2023 मध्ये तो आपल्या संघासाठी शानदार गोलंदाजी करताना दिसून येत आहे. चालू हंगामात आतापर्यंत त्याने 4 बळी घेतले आहेत.
5. इशांत शर्मा
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकला. दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केले. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने आपल्या संघासाठी 3 सामने खेळले आहेत आणि 4 विकेट्सही घेतल्या आहेत. दरम्यान, 19 धावा खर्च करून 2 बळी ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. (The experienced players of the Indian team, who are making a comeback in IPL 2023, are performing well)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निर्णायक सामन्यात सनरायझर्स-सुपरजायंट्स आमनेसामने! नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम फलंदाजी
मुंबईच्या विजयाने वाढली आरसीबीची धाकधूक! आता ‘या’ मार्गाने पोहोचू शकतात प्ले ऑफ्समध्ये