---Advertisement---

प्रेरक-पूरनच्या आतिषबाजीने लखनऊ विजयी! सनरायझर्सचे आव्हान संपुष्टात

On: शनिवार, मे 13, 2023 7:20 PM
Prerak Mankad
---Advertisement---

शनिवारी (13 मे) आयपीएलच्या मैदानता सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. उभय संघांतील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

शेवटच्या सहा चेंडूत लखनऊला विजयासाठी 4 धावा हव्या होत्या. फजलहक फारुकी या षटकात गोलंदाजीला आला होता. फारुकीच्या पहिल्या चेंडूवर निकोलस पुरन स्ट्राईकवर होता आणि त्याने दोन धावा घेतल्या. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पुरनने चौकार मारला आणि लखनऊने सामना जिंकला. या पराभवानंतर आयपीएल 2023 मधील सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आल्याचे दिसते.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, लखनऊपुढे विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी तीन विकेट्सच्या नुकसानावर 19.2 षटकांमध्ये गाठले. लखनूसाठी मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांच्यासह प्रेरक मांकड याने सर्वोत्तम प्रदर्शन केले. स्टॉयनिसने 25 चेंडूत 40 धावा केल्या. पूरनने 13 चेंडूत 44*, तर प्रेरकने 45 चेंडूत 64 धावा कुटल्या. या तिघांमध्ये मार्करमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. तब्बल 338.46च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

हैदराबादसाठी ग्लने फिलिप्स, मयांक मारकंडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. पहिल्या डावात लखनऊच्या गोलंदाजी आक्रमणात कर्णधार कृणाल पंड्या सर्वोत्तम प्रदर्शन करू शकला होता. कृणालने 4 षटकात 24 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या होत्या. ऍडेन मार्करम आणि ग्लेन फिलिप्स यांना 13व्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने बाद केले होते.

लखनऊसाठी हंगामातील 12व्या सामन्यातील हा 6वा विजय ठरला. गुणतालिकेत संघ 13 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे हैदराबादने 11सामन्यांपैकी आपला 7वा सामना गमावला. हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. दुसरीकडे लखनऊछ्या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा फ्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे. राजस्थान संघ 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.  (IPL 2023 SRH vs LSG result news)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादच्या चाहत्यांनी पार केली हद्द! पाहुण्या लखनऊसोबत गैरप्रकार, लाईव्ह सामना थांबला
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---