भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आयपीएलमध्ये मात्र खेळतच आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चार आयपीएल ट्रॉफी जिंकलून दिल्या आहेत. आयपीएल इतिहासातील धोनी दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हीदेखील धोनीची मोठी चाहती असल्याचे नुकतेच समोर येत आहे.
सनी लिओनी (Sunny Leone) हिने नुकताच खुलासा केला आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील तिचा आवडता संघ आहे. आपल्या इंस्टाग्रमा खात्यावरून सनीने ही माहिती सर्वांसोबत शेअर केले आहेत. सचिन तेंडुलकर याविषयी बोलताना त्याला दिग्गज असी उपमा दिली. सर्वोत्तम फिनिशरच्या प्रश्नावर देखील सनीने धोनीचेच नाव घेतले. चाहत्यांनी तिला ख्रिस्टिआनो रोनाल्ड आणि लिओनेल मेसी यांच्यातील क्रिकेटपटू निवडायला लावले होते. पण सनीने मात्र भारतीय सनील चेत्री याला आपला आवडता फुटबॉलपटू म्हटले. आपल्या इस्टाग्रमा स्टोरीच्या माध्यमांतून धोनीने ही माहिती शेअर केली आहे.
दरम्यान, एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मागच्या काही आयपीएल हंगामांपासून सुरू आहेत. पण धोनीने मात्र अद्याप आयपीएल निवृत्तीचे संकेत दिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच धोनी म्हणाला की, “मी निवृत्ती घेत असल्याचे तुमच्याकडून बोलले जात आहे. मी अजून यावर काहीच बोललो नाहीये.” तसेच धोनीसोबत बरेच दिवस खेळलेला आणि त्याचा चांगला मित्र सुरेश रैना यानेही याविषयी संकेत दिले आहेत. रैनाच्या मते तो धोनीला जेवढा जाणतो, त्यावरू असे वाटते की धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाही.
धोनीच्या निवृत्तीची चर्चा कशामुळे?
धोनी सध्या 41 वर्षांचा आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये तो वयाची 42 वर्ष पर्ण करणार आहे. असात धोनीचे वय पाहून त्याच्या निवृत्तीची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच धोनीने मागे एकदा आपले होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर आयपीएलमधून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मागच्या तीन आयपीएल हंगामांमध्ये कोरोनामुळे चेपॉक स्टेडियमवर एकही आयपीएल सामना खेळला गेला नाही. पण यावर्षी मात्र सीएसकेला आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी मिळत आहे. अशातच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही वाढल्या आहेत. (Sunny Leone’s favorite cricketer is MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा
धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सुरेश रैनाचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाचून CSK फॅन्सही होतील खूपच खुश