आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. अखेरीस 229 धावांचा पाठलाग करताना यजमान केकेआर संघ 205 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी, सनरायझर्स हैदराबादने 23 धावांनी सामना आपल्या नावे करत दुसरा विजय संपादन केला.
Match 19. Sunrisers Hyderabad Won by 23 Run(s) https://t.co/odv5HZvk4p #TATAIPL #KKRvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआ चा कर्णधार नितीश राणा याने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हॅरी ब्रुक व मयंक अगरवाल यांनी 4 षटकात 46 धावांची सलामी संघाला दिलेली. मात्र, रसेलने पाचव्या षटकात मयंक व त्रिपाठी यांना बाद केले. यादरम्यान ब्रुकने आपले पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार एडेन मार्करम याने 25 चेंडूत 50 धावांची वेगवान खेळी केली. हैदराबाद संघ अडचणीत सापडेल असे वाटत असताना, अभिषेक शर्मा याने 32 धावांची खेळी केली. ब्रुकने वेगवान गोलंदाजांवर आक्रमक चढवले. अखेरच्या षटकात ब्रुकने 55 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने पहिले शतक पूर्ण केले. अखेर क्लासेनने 16 धावा केल्याने हैदराबादला 228 अशी मोठी मजल मारता आली.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरचा गुरबाज पहिल्या षटकात तंबूत परतला. व्यंकटेश अय्यर 11 व सुनील नरेन खाते न खोलता बाद झाल्याने केकेआरच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, कर्णधार राणाने प्रतिहल्ला चढवला. त्याने उमरान मलिकच्या एकाच षटकात 28 धावा वसूल केल्या. जगदीशनसह त्याने 62 धावा जोडल्या. परंतु, जगदीशन व रसेल पाठोपाठ बाद झाले.
विजय केकेआरपासून बराच दूर वाटत असताना राणासह रिंकूने फटकेबाजी केली. राणा 41 चेंडूवर 75 धावा केल्यानंतर बाद झाला. रिंकू सिंगने अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्याने 31 चेंडूवर नाबाद 58 धावा केल्या. मात्र, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
(IPL 2023 Sunrisers Hyderabad Beat KKR by 23 Runs Brook Century In Winning Cause Rana Rinku Fights)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पैसा वसूल! सव्वा तेरा कोटींचा हॅरी ब्रुक बनला आयपीएल 2023 चा पहिला शतकवीर, सनरायझर्सचा 228 धावांचा डोंगर
“तू स्वतःसाठी खेळतोय, क्रिकेटच तुला धडा शिकवेल”, गिलच्या संथ खेळीनंतर संतापला वीरू