आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (13 मे) डबल हेडर सामने खेळले जातील. हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सनरायझर्सला आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवणे आवश्यक असून, लखनऊला गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी विजय मिळवावा लागेल.
या स्पर्धेत लखनऊ संघाची सुरुवात जबरदस्त झाली होती. मात्र, मागील काही सामन्यांपासून त्यांची विजयी लय बिघडली आहे. आरसीबी व गुजरातने त्यांना एकतर्फी पराभूत केले. तर, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागलेले. त्यांचे 11 सामन्यात 11 गुण असून, ते पाचव्या क्रमांकावर उभे आहेत. दुसरीकडे हैदराबाद संघासाठी देखील परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यांनी दहा सामन्यात केवळ चार विजय मिळवले असून, उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवला तरच ते प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात मोठ्या धावसंख्या होण्याची शक्यता आहे. या मैदानावर 200 धावांचा पाठलाग होत असल्याने, हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, विवरांत शर्मा, मार्को जेन्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन.
लखनऊ सुपरजायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान, यश ठाकूर.
(IPL 2023 Sunrisers Hyderabad V Lucknow Supergiants Match Preview)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना जिंकला तरी रोहित म्हणतोय, “सूर्याने आमचा प्लॅन बिघडवला”, वाचा सविस्तर
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा