---Advertisement---

‘ते नक्कीच कमबॅक करतील, त्यांच्याकडे महान खेळाडू आहेत’, शेन वॉटसनचे बलाढ्य संघाबाबत मोठे भाष्य

On: गुरूवार, मार्च 30, 2023 10:43 AM
Shane-Watson
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स संघाचाही समावेश होतो. सीएसके संघाने आतापर्यंत 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यापैकी एक 2018ची ट्रॉफी जिंकून देण्यात शेन वॉटसन याने सिंहाचा वाटा उचलला होता. तो 2020मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला. आता वॉटसन दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक झाला आहे. अशात त्याने सीएसकेबद्दल मोठे भाष्य केले आहे. खरं तर, आयपीएल 2022मध्ये सीएसकेचे प्रदर्शन निराशाजनक ठरले होते. संघाला गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहावे लागले होते.

काय म्हणाला वॉटसन?
माध्यमांशी बोलताना शेन वॉटसन (Shane Watson) याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाबाबत भाष्य केले. तो म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्स नक्कीच पुनरागमन करेल. ते नेहमीच तसे करतात. त्यांच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत आणि एमएस धोनी याच्या नेतृत्वाची बातच न्यारी आहे. यात कोणतीही शंका नाही की, ते नक्कीच जबरदस्त पुनरागमन करतील. मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीच्या शेवटपर्यंत सीएसकेकडून खेळलो होतो आणि मला खूप चांगले वाटले की, मी देखील संघाकडून चांगली फलंदाजी केली.”

https://twitter.com/ICC/status/1001093234683203584

‘एमएस धोनी हवे तोपर्यंत खेळू शकतो’
असे म्हटले जात आहे की, आयपीएल 2023 (IPL 2023) हा एमएस धोनी (MS Dhoni) याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू वॉटसन हा म्हणाला, धोनीला जोपर्यंत खेळायचे आहे, तोपर्यंत तो खेळू शकतो. कारण तो आताही खूपच फिट वाटतो. वॉटसन म्हणाला की, “एमएस धोनी जोपर्यंत हवे, तोपर्यंत खेळू शकतो. तो अजूनही खूप फिट आहे. तसेच, स्पर्धेत संघाचे नेतृत्व करतानाही तो त्याचे पूर्ण योगदान देतो. त्याला सर्वांना सांगायचे आहे की, तो अजूनही खेळू शकतो.”

आयपीएलचा पहिला सामना
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेचा पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नेरंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (ipl 2023 team csk will definitely bounce back delhi capitals assistant coach shane watson read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या एक दिवसाआधीच नरेंद्र मोदी स्टेडिअमबाबत मोठी बातमी, गुजरात टायटन्सशी आहे संबंध
‘या’ भारतीय खेळाडूमध्ये विलियम्सनला दिसला भविष्यातील कर्णधार, नाव वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---