---Advertisement---

हृदयस्पर्शी व्हिडिओ! आख्खी टीम ट्रॉफीभोवती नाचत होती, पण धोनी रात्री 3.30वाजता चाहत्यांच्या जवळ जात होता

On: मंगळवार, मे 30, 2023 2:17 PM
MS-Dhoni-IPL-2023
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली आहे. या स्पर्धेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या रूपात चॅम्पियन मिळाला आहे. चेन्नईने सोमवारी (दि. 29 मे) रात्री उशिरा गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना रात्री जवळपास दीड वाजेपर्यंत सुरू होता. तसेच, पुरस्कार सोहळा संपता-संपता रात्रीच्या 3 वाजल्या. यादरम्यान सर्व खेळाडू ट्रॉफीभोवती नाचत होते, काही ड्रेसिंग रूम किंवा हॉटेलकडे रवाना होत होते, पण प्रेक्षक तोपर्यंत स्टेडिअममध्ये उपस्थित होते. अशात महेंद्र सिंग धोनी रात्री जवळपास 3.30 वाजता चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी मैदानात उतरला.

रात्री उशिरा मैदानावर एकटा दिसला धोनी
एमएस धोनी (MS Dhoni) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी सामना संपल्यानंतर मैदानावर परत आला. रात्री जवळपास 3.30 वाजता मैदानावर चक्कर मारत चाहत्यांना धन्यवाद देताना दिसला. व्हिडिओत दिससते की, धोनी मैदानावर येताच स्टेडिअमवर पुन्हा कल्लोळ झाला आणि धोनी-धोनी नावाचा जयघोष होऊ लागला. धोनी ज्यावेळी चाहत्यांचे आभार मानत होता, त्यावेळी मैदान कव्हर्सने झाकलेले होते.

धोनीने चाहत्यांना दिला धन्यवाद
व्हिडिओत दिसते की, धोनीसोबत कोणताही खेळाडू नव्हता, फक्त कॅमेरामनची एक टीम त्याच्यासोबत चालत होती. माहीने पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्याचे चाहत्यांवर किती प्रेम आहे. धोनीने सामन्यानंतर चाहत्यांना एक आनंदाची बातमीदेखील दिली. त्याने यावेळी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावत स्पष्ट केले की, तो आताच निवृत्ती घेणार नाही. चाहत्यांसाठी तो पुढील वर्षी खेळणार असल्याचे संकेत त्याने यादरम्यान दिले.

पाचवी ट्रॉफी केली नावावर
चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संयुक्तरीत्या पहिला संघ बनला. चेन्नईने मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी केली. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 या पाच हंगामाची ट्रॉफी नावावर केली, तर मुंबईनेही 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या पाच हंगामाचा किताब जिंकला होता. (ipl 2023 thala ms dhoni thanked all the fans in the stadium late night after the match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! धोनी ऑटोग्राफ देत नव्हता म्हणून चाहरने केली BCCIच्या उपाध्यक्षाकडे तक्रार? पाहा व्हिडिओ
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---