बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2023चा 32वा सामना रंगला. रविवारी (दि. 23 एप्रिल) या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, बेंगलोरला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, तो सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही, पण नंतर गरज पडल्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेअर‘द्वारे बदल करेल. मात्र, संघाची घोषणा झाली, तेव्हा संघात रियान पराग याच्या नावाचा समावेश नव्हता. त्याला दीर्घकाळ संघातून बाहेर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, संघाचा त्याला पाठिंबा आहे.
रियान पराग (Riyan Parag) याला ‘इम्पॅक्ट प्लेअर’च्या पर्यायांमध्येही ठेवले नाहीये. यावरून स्पष्ट होते की, त्याला संघातून बाहेर केले आहे. सध्याच्या हंगामात त्याची कामगिरीही खराब झाली होती. परागने पाच सामन्यात 13.50च्या खराब सरासरीने फक्त 54 धावा केल्या होत्या. मागील सामन्यात तो संघाच्या पराभवाचे कारणही ठरला होता. अशात परागला संघातून बाहेर काढल्यामुळे चाहते खूपच आनंदात दिसले. त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रियान पराग संघातून बाहेर पडताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर
एका युजरने लिहिले की, “रियान परागला संघात न घेतल्यामुळे आनंद झाला.”
So so happy to see Riyan Parag not making it to the 11 🥰
— Ratikesh Pathak (@RatikeshPathak) April 23, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले की, “घमंडी किंग रियान पराग ड्रॉप झाला आहे.”
Attitude King Riyan Parag Dropped
— sathish reddy (@sathish97776160) April 23, 2023
आणखी एकाने लिहिले की, “मी खूप आनंदी आहे. रियान पराग प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीये आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीतही नाहीये. धन्यवाद राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापन.”
Very happy
Riyan Parag not in payling Xl and also not in impact player list
thank you Rajasthan royals management 😊😊
Khatm okay tata bye bye goodbye Riyan Parag #RRvRCB #RCBvsRR #TATAIPL2023 pic.twitter.com/id3jbNPTqN— Durgesh Singh Mertiya 🚩🇮🇳 (@DurgeshsMertiya) April 23, 2023
याव्यतिरिक्त एकाने असेही म्हटले की, “रियान पराग ड्रॉप झाल्यानंतर राजस्थान चाहते.”
finally seeing no riyan parag in playing 11. #RRvRCB #RRvsRCB #IPL2O23
RR fans : pic.twitter.com/UAovlagrdu
— Vedha/Patty & Minny Stan (@Vedhaviyaas5) April 23, 2023
एका युजरने लिहिले की, “आज रियान परागला न घेतल्यामुळे धन्यवाद राजस्थान रॉयल्स. कृपया पुढील हंगामात त्याच्यापासून सुटका मिळवा.”
Thank you @rajasthanroyals for not picking up
Riyan parag today.Please get rid of him next season.#HallaBol
— Aditya (@aditya_xiii) April 23, 2023
एकाने ट्वीट करत असे लिहिले की, “शेवटी रियान पराग संघाबाहेर झाला. त्याला ऍटिट्यूड महागात पडला. विराटसारख्या ऍटिट्यूडसाठी त्याच्यासारखं खेळलं पाहिजे.”
Riyan Parag is finally out off the team, attitude will cost him. Virat jaisa attitude ke liye virat jaisa khelna chaiye. 💯#RCBvRR
— Akshay (@akshay_lutade) April 23, 2023
बेंगलोरचा डाव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 189 धावांचा डोंगर उभारला. यावेळी बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने 77, तर फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने 62 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. (ipl 2023 twitter reactions as cricketer riyan parag dropped from rajasthan royals playing xi against rcb)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल बनला आरसीबीसाठी 1000 धावा करणारा पाचवा खेळाडू, यादीतील पहिल्या चौघांविषयी घ्या जाणून
विराटची विकेट काढताच बोल्टचा नाद पराक्रम! IPLमध्ये आतापर्यंत ‘एवढ्या’ फलंदाजांना शून्यावर धाडलंय तंबूत