इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जगभरातील खेळाडूंचा भरणा आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत, तर काही जण फक्त एक सामना चांगला खेळून बाकी सामन्यात फ्लॉप कामगिरी करत आहेत. यामध्ये इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याच्या नावाचाही समावेश आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने हॅरी ब्रूक याला 13.25 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. मात्र, जेव्हा आयपीएलमध्ये प्रदर्शन करण्याची वेळ आली, तेव्हा एक सामना सोडून ब्रूक सर्व सामन्यात फ्लॉप ठरत आहे. शनिवारी (दि. 29 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात ब्रूक फक्त 2 चेंडूत शून्य धाव करून तंबूत परतला. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा हैदराबादच्या चाहत्यांना नाराज केले.
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी हॅरी ब्रूक (Harry Brook) हा आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून उतरला होता. मात्र, दिल्लीविरुद्ध त्याला मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरवले. कर्णधार एडेन मार्करम हा बाद झाल्यानंतर तोदेखील लगेच तंबूत परतला. ब्रूकने या आयपीएल हंगामात 8 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण 163 सामने खेळले आहेत. यामधये त्याने 100 धावा या एकाच सामन्यात चोपल्या होत्या. म्हणजेच इतर 7 सामन्यात त्याला फक्त 63 धावा करता आल्या आहेत.
हॅरी ब्रूक हा सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. खरं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे ब्रूकला हैदराबादने 13.25 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत ताफ्यात घेतले होते. मात्र, तो लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दिसत नाहीये.
ब्रूकच्या खराब कामगिरीवर ट्विटरवर प्रतिक्रिया
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “हॅरी ब्रूक- तू एक फलंदाज आहेस ना.”
Harry Brook 😭 pic.twitter.com/WIgFB1p3bb
— 💙 (@Alreadysad__) April 29, 2023
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “आणखी एका संधीसाठी काव्याकडे विनंती करताना हॅरी ब्रूक.”
https://twitter.com/rajputids/status/1652361584533213184
आणखी एकाने ट्वीट करत लिहिले की, “सामन्यानंतर हॅरी ब्रूकसोबत काव्या मारन.”
Kavya Maran With Harry Brook after the Match: pic.twitter.com/Rn3Ok2XZ6J
— Pulkit🇮🇳 (@pulkit5Dx) April 29, 2023
एकाने ट्वीट करत असेही लिहिले की, “सपाट खेळपट्टी नसूनही एबी डिविलियर्सचा शिष्य हॅरी ब्रूक एकही धाव करू शकत नाहीये.”
Abd student Harry Brook without flat pitches can't score a single run😍 pic.twitter.com/qnxX3irNJc
— v. (@vanshtweetz) April 29, 2023
एका युजरने गंभीर ट्वीट करत म्हटले की, “आपण अशा देशात राहतो, जिथे हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपये आणि तिलक वर्माला 1.7 कोटी रुपये मिळतात.”
We live in a country where
Harry brook Tilak Varma
Gets 13cr gets 1.7cr pic.twitter.com/ca7wjEPC1q— Monk. (@Itsmonk_45) April 21, 2023
हॅरी ब्रूक या सामन्यात खास कामगिरी करू शकला नसला, तरीही हैदराबादने हा सामना 9 धावांनी जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत आठवा क्रमांक पटकावला आहे. (ipl 2023 twitter reactions srh batsman harry brook flops again vs delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये जोशुआ लिटलचा विक्रम! सामनावीर बनताच खुलासा करत म्हणाला, ‘हार्दिक पंड्यामुळे…’
दिल्लीला दिल्लीत हरवल्यानंतर SRHचा कॅप्टन भलताच खुश, सामन्यानंतर म्हणाला, ‘मला काहीच अडचण नाही…’