इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54वा सामना मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात मंगळवारी (दि. 9 मे) खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएल 2023च्या प्ले-ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे खूपच महत्त्वाचे आहे. बेंगलोर संघाने त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. तसेच, मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनेही मुंबईला 6 विकेट्सने पराभूत केले होते.
वानखेडेत दिसला विराट कोहलीचा जलवा
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत बेंगलोर संघाने संमिश्र कामगिरी केली आहे. या हंगामात आरसीबी (RCB) संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हादेखील खतरनाक फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे, किंग कोहलीचा जलवा हा बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमपासून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमपर्यंत (Wankhede Stadium) कामय आहे.
विराटचा खणखणीत षटकार
झाले असे की, मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये जेव्हा विराट कोहली सराव सामन्यासाठी मैदानात उतर होता, तेव्हा त्यावेळी त्याचे त्याच्यासाठी चीअर करत होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, वानखेडे स्टेडिअमवर सराव सामन्यात जेव्हा विराट पव्हेलियनच्या पायऱ्यांवरून उतरून मैदानात जात होता, तेव्हा प्रेक्षक ‘विराट-विराट’ म्हणत होते. यावरून समजते की, बंगळुरूचं मैदान असो किंवा मुंबईचं मैदान सर्वत्र विराटचा डंका पाहायला मिळतोच.
Wankhede croud going mad for Kohli.
Chokli chokli chants in mud ????.https://t.co/O47A7fJhmt— Suraj. (@suprsuraj) May 8, 2023
बेंगलोर संघाची कामगिरी
बेंगलोर संघाने हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामन्यात विजय, तर 5 सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. याव्यतिरिक्त विराट कोहली याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने हंगामात 10 सामन्यात फलंदाजी करताना 46.56च्या सरासरीने 419 धावांचा पाऊस पाडला आहे. या धावा करताना त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, विराट याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 7000 धावांचा टप्पाही पार केला आहे. (ipl 2023 virat kohli hit six at wankhede stadium during the practice session see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमबॅक करण्यासाठी पंजाब अन् कोलकाता IPLच्या 53व्या सामन्यात आमने-सामने, टॉस जिंकून ‘किंग्स’ची बॅटिंग
एक-एक धावेसाठी तरसणाऱ्या रोहितसाठी शास्त्रींचा खास संदेश, म्हणाले, ‘अजून हंगाम संपला नाही…’






