---Advertisement---

कॅप्टन्सी सोडल्यानंतर 556 दिवसांनी विराट पुन्हा बनला कर्णधार, ‘या’ कारणामुळे सांभाळली संघाची धुरा

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 4:02 PM
Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या 27व्या  सामन्यात पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने आले. या सामन्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात दोन्ही संघांनी आपले नवीन कर्णधार उतरवले होते. पंजाबची धुरा सॅम करन या अष्टपैलू खेळाडूच्या खांद्यावर सोपवली, तर बेंगलोर संघाचे कर्णधार विराट कोहली याच्याकडे आले. मात्र, विराटच्या बाबतीत हा निर्णय का घेण्यात आला? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात…

झाले असे की, पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील नाणेफेकीसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यांच्या ऐवजी सॅम करन (Sam Curran) आणि विराट कोहली (Virat Kohli) आले. ही नाणेफेक करनने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी या दोघांना मैदानावर पाहून चाहतेही गोंधळात पडले. कदाचित सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की, विराटने कर्णधारपद सोडले आहे, तरीही तो नाणेफेकीसाठी कसा आला?

https://twitter.com/IPL/status/1648989676844494848

आरसीबीचे नेतृत्व विराटकडे
तर झाले असे की, फाफ डू प्लेसिस हा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या जागी विराट आजच्या सामन्यात बेंगलोरसाठी नेतृत्व करत आहे. नाणेफेकीवेळी विराटने सांगितले की, “फाफ आज क्षेत्ररक्षण करू शकणार नाही, त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. खेळपट्टी संथ होऊ शकत होती. एका वेळी एक सामना लक्षात घेत, आपल्या खेळावर लक्ष देणे, कठीण परिस्थितीचा अधिकाधिक फायदा आम्हाला घ्यायचा आहे. आम्ही स्पर्धेत आतापर्यंत असे केले नाही. आमच्यासाठी हे काही वेगळे परिवर्तन नाही.”

विराटने 2021मध्ये सोडलेले कर्णधारपद
विराट कोहली याने 11 ऑक्टोबर, 2021 रोजी आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर त्याने आता 556 दिवसांनंतर कर्णधारपदाची धुरा पुन्हा सांभाळली. विराटला पुन्हा एकदा कर्णधारपदाच्या भूमिकेत पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विराट कोहली हा 141व्या सामन्यात नेतृत्व करत आहे. यामध्ये त्याने 64 सामन्यात विजय मिळवला, तर 69 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, 3 सामने बरोबरीत सुटले, तर 4 सामन्यांचा निकाल लागला नाही. (ipl 2023 virat kohli is leading rcb against pbks know reason)

https://twitter.com/IPL/status/1648984510913196032

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्स
अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, नेथन एलिस, राहुल चाहर, अर्शदीप सिंग.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन विराट कोहली नाणेफेकीत अपयशी, सॅम करनच्या नेतृत्वात पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय
आयपीएलमधील अंडररेटेड आणि सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतली दिग्गजांची नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---