आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली सोमवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी शुन्यावर बाद झाला. पण चालू आयपीएल हंगामात त्याने प्रदर्शन चांगले राहिले आहेत. विराटने हंगामताली पहिल्या पाच सामन्यात तीन अर्धशतके केली आहेत. गुरुवारी (20 एप्रिल) आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात आमना सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी विराटने एका मुलाखतीत दिली आणि आयपीएलमधील काही सर्वोत्तम खेळाडू निवडले.
विराट कोहली (Virat Kohli) याने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत त्याला काही खास प्रश्न विचारले गेले. विराटला या मुलाखतीत एका रॅपिड फायरचा सामना करावा लागला. यात थ्याला आयपीएल इतिहासातील सर्वात दुर्लक्षीत खेळाडूविषयी विचारले गेल्यानंतर त्याने अंबाती रायडू (Ambati Rayudu) याचे नाव घेतले. आयपीएलमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) असल्याचे विराट म्हणाला. सुनील नरेन (Sunil Narine) आणि राशिद खान (Rashid Khan) यांच्यातील एका फिरकीपटूची निवड करायला सांगितल्यानंतर विराटने राशिदला प्रधान्य दिले. टी-20 फॉरमॅटमध्ये पूल शॉट हा विराटचा आवडता शॉट असल्याचे त्याने सांगितले. सीएसकेविरुद्ध खेळायला सर्वात जास्त आवडते, असेही विराट या मुलाखतीत म्हणाला.
— Om janjire | ????️ (@Omjanjire) April 20, 2023
दरम्यान, विराटने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 5 सामन्यात 220 धावा कुटल्या आहेत. यात त्याने मुंबई इंडियन्स (82*), गुजरात जायंट्स (61) आणि दिल्ली कॅपिटल्स (50) संघाविरुद्ध त्याने अर्धशतके केली आहेत. आरसीबीने हंगामातील आपल्या पहिल्या पाच सामन्यातील दोन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सं संघांकडून आरसीबीला पराभव स्वीकारावा लागला आहे. (Who is the underrated and best player in IPL? Virat took the names of legends)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीप्रति विराट एवढा प्रामाणिक कसा? किंग कोहलीने स्वतः दिले उत्तर
आयपीएलमध्ये जबरदस्त रेकॉर्ड! 26च्या 26 सामन्यात मिळाले वेगवेगळे मॅच विनर, जाणून घ्याच