भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला होता आणि तेव्हापासून विराट फक्त आरसीबीसाठीच खेळत आला आहे. आयपीएलमधील कोणताही संघ सध्या विराटला आपल्यासोबत जोडण्यासाठी तयार आहे. मात्र, विराट मात्र आरसीबीची साथ सोडत नाही. विराटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरसीबीसोबत त्याचे नाते एवढे घट्ट असण्यामागचे कारण सांगितले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने जिओ सिनेमासाठी रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला मुलाखत दिली. यावेळी विराटने आरसीबीसोबत त्याचे नाते एवढे घट्ट असण्यामागचे कारण सांगितले. विराट म्हणाला, “जेव्हा आयपीएल एकदी नवीन होती, तेव्हा मी एका फ्रँचायझीसोबत बोललो होतो. मला त्या संघासाठी वरच्या फळीत खेळायची इच्छा होती. मात्र, त्यांनी माझे मत विचारात घेतले नाही. तेव्हा मी पाच विंका सहाव्या क्रमांकावर खेळायचो. पण 2011 साली हीच फ्रँचायझी माझ्याकडे पुन्हा आली. मी आरसीबीला एवढे महत्व देण्याचे कारण, लीगच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्यांनी मला पाठबळ दिले. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू इच्छितो, असे मी त्यांना सांगितल्यानंतर, संघाने माझ्या निर्णयाला समर्थनच दिले.”
विराट कोहली 2011 पर्यंत भारतीय संघासाठी धावा करू लागला होता आणि संघातील त्याचे स्थान पक्के झाले होते. अशात पहिल्या आयपीएल हंगामात ज्या फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, त्या संघाकडून 2011 मध्ये खेळण्यास देखील विराटने नकार दिला. मुलाखतीत विराट पुढे म्हणाला की, “मी फ्रँचायझीचे नाव घेणार नाही, पण मला जेव्हा त्यांच्यासाठी खेळायचे होते, तेव्हा त्यांना माझे ऐकले नाही. पण भारतीय संघासाठी धावा करू लागल्यानंतर मात्र मी लिलिवात उतरावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, मी त्या संघाला स्पष्ट नकार दिला. मी त्या संघासोबत राहू इच्छित होतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास असेल आणि जेव्हा माझ्यावर इतर कोणी विश्वास दाखवण्यास तयार नव्हते, तेव्हा आरसीबीने पुढाकार घेतला.”
दरम्यान विराट कोहली याच्या आरसीबी (RCB) संघ आयपीएलमधील काही मोजक्या बलाढ्य संघांपैकी एक आहे. मात्र, अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी आरसीबीला जिंकता आली नाहीये. यावर्षी आरसीबीने हंगामातील पहिल्या पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत आरसीबी सध्या आठव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी (20 एप्रिल) चालू आयपीएल हंगामातील आपला सहावा सामना आरसीबी संघाला पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. (Virat Kohli on his honesty with RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानला पराभूत केल्यानंतर राहुलचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘मी कर्णधार म्हणून काहीतरी चुकीचं…’
‘रियान परागमुळेच हारली राजस्थान…’, लखनऊने रॉयल्सचा धुव्वा उडवताच रवी शास्त्रींची तिखट प्रतिक्रिया






