क्रिकेट चाहते 22 मार्च 2024 या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या दिवसापासून आयपीएलचा 17 वा सीजन सुरू होईल. आयपीएलमध्ये प्रत्येकाची स्वतःची आवडती टीम असते. या टीमचं समर्थन करण्यासाठी चाहते कधीकधी सर्व मर्यादा ओलांडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेले जबरा फॅन, जे सुरक्षेला चकमा देत आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी चक्क मैदानात धाव घेतात. चला तर मग, तुम्हा चाहत्यांना सविस्तरपणे सांगूया IPL 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची नावं.
1. चेन्नई सुपर किंग्स (CSK)- महेंद्रसिंह धोनी
पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन सीएसके संघाचं नेतृत्व यंदा देखील एमएस धोनीच करणार. हे कदाचित त्याचं शेवटचं आयपीएल असेल. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK नं 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे.
3. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) – श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करेल. तो दुखापतीमुळे मागील हंगामात खेळला नव्हता. गेल्या मोसमात नितीश राणानं केकेआरचं नेतृत्व केलं होतं. केकेआरनं IPL 2022 च्या लिलावात अय्यरला 12.25 कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं.
4. लखनौ सुपर जायंट्स (LSG) – केएल राहुल
लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे. तो सध्या दुखापतीमुळे एनसीएमध्ये दाखल आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल. दुखापतीमुळेच राहुलला आयपीएलच्या शेवटच्या हंगामात महत्त्वाची भूमिका बजावता आली नव्हती. राहुलच्या नावावर आयपीएलमध्ये 4000 हून अधिक धावा आहेत.
2. दिल्ली कॅपिटल्स (DC) – डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाबाबत अजूनही शंका आहेत. ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये खेळणार आहे, परंतु तो दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पंतनं दिल्ली संघाची जबाबदारी स्वीकारली नाही, तर गेल्या हंगामाप्रमाणे या वेळीही डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसेल.
5. गुजरात टायटन्स (GT) – शुबमन गिल
आयपीएल 2022 ची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्सचं नेतृत्व युवा स्टार शुबमन गिल करेल. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर गिलला गुजरातचं कर्णधार बनवण्यात आलंय. कोच आशिष नेहराच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आयपीएलमध्ये केवळ दोन हंगाम जुना आहे, मात्र त्यांच्या नावावर एक विजेतेपद आणि एक उपविजेतेपद आहे.
9. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) – फाफ डु प्लेसिस
फाफ डू प्लेसिस आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचं नेतृत्व करेल. 2021 मध्ये विराट कोहलीनं कर्णधारपदं जबाबदारी सोडल्यानंतर फ्रँचायझीनं ही जबाबदारी फाफला दिली. त्याला लिलावात 7 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. डु प्लेसिसनं आयपीएलमध्ये 130 सामन्यात 33 अर्धशतकं झळकावली आहेत.
6. मुंबई इंडियन्स (MI) – हार्दिक पांड्या
आयपीएल 2024 पूर्वी, मुंबईनं हार्दिक पांड्याला आपल्या संघात ट्रेड केलं. आता रोहित शर्माच्या जागी त्याला संघाची कमान देण्यात आली आहे. मुंबईनं रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेतल्यानं चाहते नाराज आहेत. गुजरात टायटन्समध्ये खेळण्यापूर्वी पांड्या मुंबई इंडियन्सचाच भाग होता.
7. पंजाब किंग्स (PBKS) – शिखर धवन
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व शिखर धवन करेल. त्याच्या नावे आयपीएलमध्ये 217 सामन्यात 6,617 धावा आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
8. राजस्थान रॉयल्स (RR) – संजू सॅमसन
संजू सॅमसन आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे. राजस्थान रॉयल्सनं 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील पहिलं आणि शेवटचं जेतेपद पटकावलं होतं. सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानची टीम 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली होती.
10. सनरायझर्स हैदराबाद (SRH) – पॅट कमिन्स
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देणारा पॅट कमिन्स आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व करेल. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात हैदराबादनं कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना करारबद्ध केलंय. एडन मार्करमनं गेल्या वर्षी संघाचं नेतृत्व केले होतं. मात्र ते गुणतालिकेत तळाशी राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर
एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत
IPL मध्ये लांब केसांचा लूक घेऊन परततोय ‘थाला’! नेटमध्ये सरावाला सुरुवात; CSK ने शेअर केला व्हिडिओ