कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने आयपीएल 2024च्या लिलिवात आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाला नुकताच वनडे विश्वचषक जिंकवून देणारा पॅट कमिन्स दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्र याने विदेशी खेळाडूंना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्यामुळे एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर आयोजित केला होता. दुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात मिचेल मार्श याने रातोरात 24.75 कोटी रुपयांची कमाई केली. कोलकाता नाईट राडयर्सने त्याला खरेदी करण्यासाठी ही मोठी रक्कम खर्च केली. तसेज दुसरीकडे 20.50 कोटी रुपये कर्च करून सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने पॅट कमिन्स याला संघात सामील केले. हे दोन्ही वेगवान गोलंदाज नुकताच विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी आयपीएल लिलिवात ही मोठी रक्कम मिळवली.
पण माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा याच्या मते विदेशी खेळाडू या रकमेसाठी पात्र नाहीत. चोप्राच्या मते भारतीय दिग्गज, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षा विदेशी खेळाडूंना जास्त किंमत मिळत आहे, जे योग्य नाही.
आपल्या युट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला, “मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपये मिळाले, तर पॅट कमिन्स 20.50 कोटी रुपयांमध्ये विकला गेला. भारतीय खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराह 12 कोटी, एमएस धोनी 12 कोटी, विराट कोहली 17 कोटी आणि रोहित शर्माला 16 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सॅम करन आणि कॅमरून ग्रीन हे सर्वजण भारतीय खेळाडूंपेक्षा महाग आहेत. यालाच कलयूग म्हणायचं का? जसप्रीत बुमराह आयपीएल आणि जगातील सर्वोत्तम टी-20 गोलंदाज आहे. पण त्यापेक्षा जास्त रक्कम ही मिचेल स्टार्कला मिळत आहे. हे योग्य नाही.”
दरम्यान, विराट, रोहित, बुमराह आणि एमएस धोनी भारतीय संघाचे महान खेळाडू आहेत. पण आयपीएल लिलिवात हे खेळाडू प्रत्यक्षपणे उतरले नसल्यामुळे त्यांच्यावर मोठी बोली देखील लागत नाही. फ्रँचायझीकडून ठरल्याप्रमाणे त्यांना मिळणारी रक्कम ही निश्चित आहे. तर दुसरीकडे विदेशी आणि त्याचसोबत भारतीय खेळाडू लिलिवातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावताना दिसतात. (IPL 2024 Auction । The former cricketer expressed his displeasure over foreign players getting paid more than Indian players)
महत्वाच्या बातम्या –
Cricket । वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीला राष्ट्रीय पुरस्कार घोषित, नव्या वर्षीची होणार शुभ सुरुवात
BBLमध्ये घोंगावलं जॉर्डन नावाचं वादळ! विस्फोटक बॅटिंग करत फक्त ‘एवढ्या’ चेंडूत झळकावली Fast Fifty, Record