IPL 2024 Retention: आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव दुबईमध्ये 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, लिलावाचे आयोजन परदेशात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, यापूर्वी आयपीएलचे सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलकडे सोपवली आहे. आयपीएल रिटेन्शन यादी पाहिली, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने सर्वाधिक 12 खेळाडू रिलीज केले आहेत, तर पंजाब किंग्स संघाने सर्वात कमी 5 खेळाडू रिलीज केले आहेत.
प्रत्येक संघाकडे 5 कोटी
आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावासाठी (IPL Auction) सर्व संघांकडील रक्कम 95 कोटींवरून वाढून 100 कोटी करण्यात आली आहे. म्हणजेच, प्रत्येक संघाच्या पर्समध्ये 5 कोटींची वाढ झाली आहे. आयपीएल रिटेन्शन (IPL Retention) पाहिलं, तर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 8 खेळाडूंना रिलीज केले आहे. संघात अजूनही 6 जागा बाकी आहेत. चेन्नईकडे रिटेन्शननंतर 31.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएल रिटेन्शनमध्ये 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. तसेच, 16 खेळाडूंना रिटेन केले आहे. याव्यतिरिक्त रोमारियो शेफर्ड याला लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून ट्रेड केले आहे.
कोणत्या संघाकडे सर्वाधिक पैसा?
आयपीएल रिटेन्शननंतर सर्वाधिक पैसा कोणत्या संघाकडे शिल्लक असेल, तर तो संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challnegers Bangalore) आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी रुपये उरले आहेत. आरसीबीने रिटेन्शनमध्ये 18 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये मयंक डागरला सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेड करत संघात घेतले आहे. याव्यतिरिक्त 11 खेळाडूंना रिलीज केले आहे.
सर्व 10 संघांकडे किती रुपये उरले?
बेंगलोर- 40.75 कोटी
सनरायजझस हैदराबाद- 34 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स- 32.7 कोटी
चेन्नई सुपर किंग्स- 31.4 कोटी
पंजाब किंग्स- 29.1 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 28.95 कोटी
मुंबई इंडियन्स- 15.25 कोटी
राजस्थान रॉयल्स- 14.5 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स- 13.15 कोटी
गुजरात टायटन्स- 23.15 कोटी
Salary cap for all IPL teams. pic.twitter.com/YYZOW69HlY
— Johns. (@CricCrazyJohns) November 26, 2023
आयपीएल स्पर्धेविषयी थोडक्यात
आयपीएल इतिहासात आतापर्यंत 16 हंगाम पार पडले आहेत. यातील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी संयुक्तरीत्या सर्वाधिक 5 वेळा किताब जिंकला आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा ट्रॉफी नावावर केली आहे. तसेच, डेक्कन चार्जर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांकडे प्रत्येकी 1 ट्रॉफी आहे. (ipl 2024 auction this team has most money know the purse of each ipl team after retention and release of players 2023)
हेही वाचा-
कोण करणार गेलचा IPLमधील 175 धावांचा रेकॉर्ड मोडण्याची डेरिंग? स्वत: ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणाला, ‘तो फलंदाज…’
‘सोनू’चा बड्डे: टी20 स्टार Suresh Rainaबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहिती आहेत का?