---Advertisement---

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात मोठा बदल, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गज्याने केला संघात प्रवेश

On: शनिवार, मार्च 2, 2024 11:46 AM
---Advertisement---

आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. तर यावेळी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात डिफेंडिंग चैम्पिंयन चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चैलेंजर्स बैगलोर यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच हा सामना चेपॉक येथे पार पडणार आहे. याबरोबरच आयपीएलचे वेळापत्रक फक्त 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत जाहीर झाले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीच्या तारखेनंतरच उर्वरित वेळापत्रक समोर येणार आहे. याआधी लखनऊ सुपर जायंट्सची फ्रँचायझी यावेळी संघात सतत बदल करताना पहायला मिळत आहे. तर यावेळी संघात आणखी एक मोठा बदल करण्यात आला असून दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी दिग्गजाने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात प्रवेश केला आहे.

याआधी लखनौ लखनऊ सुपर जायंट्सने गुरुवारी निकोलस पुरनला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले होते. तर आता शुक्रवारी रात्री संघाच्या शिबिरात आणखी एक सहायक प्रशिक्षक दाखल झाला असून तो दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर आहे. तर आयपीएलचाच्या 17व्या हंगामात क्लुजनर संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि सहकारी सहाय्यक प्रशिक्षक एस. श्री राम सोबत काम करताना पहायला मिळणार आहे. तर लान्स क्लुजनरला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. तसेच या हंगामाच्या सुरुवातीला लखनौ लखनऊ सुपर जायंट्सने जस्टिन लँगरलाची मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवरच्या जागी नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलपूर्वी पुन्हा जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. याआधी गेल्या वर्षीही त्याला कंबरेच्या दुखापतीने त्रासले होते. त्यामुळे तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेला होता. त्यानंतर त्याने आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही तो टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता. तसेच राहुल तंदुरुस्त नसल्यास अनुभवी कर्णधार निकोलस पुरन आयपीएल 2024 मध्ये संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो.

आयपीएल 2024 साठी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ पुढीलप्रमाणे – केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, काइल मेयर्स, देवदत्त पडिककल, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, यश ठाकूर. , प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मयंक यादव, शामर जोसेफ, मोहसीन खान, कृष्णप्पा गौतम, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, मोहम्मद अर्शद खान.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---