---Advertisement---

IPL 2024 : धोनीच्या खास मित्रानं स्पष्टच सांगितलं, ‘धोनी आणखी दोन आयपीएल सीझन खेळणार…

On: शनिवार, मार्च 2, 2024 10:37 AM
Rohit Sharma MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल 2024 च्या तयारीला लागला आहे. तसेच 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एमएस धोनी सतत आयपीएलचा भाग आहे. त्याने गेल्या वर्षी 2023 मध्ये संघाचे कर्णधारपदही भूषवले आणि आपल्या संघाला 5 वेळा चॅम्पियन बनवले होते. मात्र गेल्या हंगामानंतर, तो त्याच्या गुडघ्याने त्रासलेला दिसला आणि त्यानंतर लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा हा थला शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार अशी चर्चा सुरू झाली होती.

यावर धोनीच्या जवळचा मित्र रमजीत सिंहने धोनी कधीपर्यंत आयपीएल खेळू शकतो याची माहिती दिली आहे. तसेच धोनी कधी आणि कोणता निर्णय घेईल हे कोणालाच कळू शकत नाही. एमएस धोनीने अचानक लग्न केले, अचानक कसोटी क्रिकेट सोडले आणि अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा धोनीचा शेवटचा सीझन असेल का, असा अंदाज लावला जात आहे. पण दरवर्षी धोनी काहीतरी वेगळे करत असतो.

https://twitter.com/div_yumm/status/1763531715694444773

अशातच एमएस धोनीचा जवळचा मित्र परमजीत सिंगने पॅन क्रिकेटशी बोलताना म्हणाला आहे की, ‘चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आता एक किंवा दोन आयपीएल सीझन खेळणार आहे. तसेच 2024 चा हंगाम त्याचा शेवटचा नसून तो आता खूप तंदुरुस्त आहे आणि सीएसकेसाठी सहज खेळू शकतो.’ परमजीत सिंग हा एमएस धोनीचा बालपणीचा मित्र आहे आणि त्याने त्याला त्याच्या कारकिर्दीत पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

https://twitter.com/SraavyaPawanist/status/1760523219168120957

दरम्यान, एमएस धोनीने 2008 ते 2023 पर्यंत सतत आयपीएल खेळत असून त्याने 250 सामने खेळले आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पाच विजेतेपद मिळवून दिले आहेत. तसेच 250 IPL सामन्यात 5082 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 24 अर्धशतकेही असून यावेळी त्याची स्पर्धेतील सरासरी 38.7 आणि स्ट्राइक रेट 135.9 आहे. याबरोबरच 226 आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---