महिला प्रीमियर लीग 2024 मधील आठव्या सामन्यात युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. तसेच युपीचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तर गुजरात जायंट्ला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर पॉइंट टेबलमध्ये, यूपीच्या विजयाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असून मुंबई इंडियन्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर गेला आहे.
याबरोबरच या सामन्यात नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय युपीच्या पथ्यावर पडला. कारण गुजरातला 20 षटकात 5 गडी गमवून 142 धावा करता आल्या आणि विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान युपी वॉरियर्सने 4 गडी गमवून 16 षटकात पूर्ण केलं आहे. यामध्ये यूपीसाठी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत सोफी एक्लेस्टोनने 4 षटकात 20 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या आहेत. तसेच राजेश्वरी गायकवाडनेही 4 षटकांत 33 धावा देत 1 विकेट्स घेतली आहे.
दुसरीकडे, युपी वॉरियर्सने पहिल्या षटकापासूनच आक्रमक रुप धारण केलं होतं. एलिसा हिली आणि किरण नवगिरे या जोडीने पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. पण नवगिरे मागच्या सामन्याप्रमाणे काही खास करू शकली नाही. 12 धावा करून किरण नवगिरे तनुजा कन्वारच्या गोलंदाजीवर तंबूत परतली. त्यानंतर चमारी अट्टापट्टूही 17 धावा करून माघारी परतील. त्यानंतर मोर्चा सांभाळला तो ग्रेस हॅरिसने आणि 33 चेंडूत 60 धावा ठोकल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
An unbeaten 60* off 33 with strokes like these 😎
Grace Harris finishes the job for the @UPWarriorz 💪
Scorecard 💻📱https://t.co/4LUKvUMAOB#TATAWPL | #UPWvGG pic.twitter.com/PI2Zuz212F
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2024
दरम्यान, यूपी वॉरियर्सच्या दुसऱ्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. तसेच टॉप 3 चे स्थान बदलले आहेत. दिल्ली कॅपिटल्स सध्या अव्वल तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. तर यूपी आता तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. विशेष म्हणजे चारही संघांचे ४-४ गुण आहेत. दिल्लीचा नेट रन रेट सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे तो अव्वल आहे.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): हरलीन देओल, बेथ मूनी (कर्णधार/विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, लॉरा वोल्वार्ड, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मन्नत कश्यप, मेघना सिंग.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड.
महत्वाच्या बातम्या –
- T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार? घ्या जाणून सविस्तर
- IPL आणि द हंड्रेडनंतर आता 90 चेंडूंची नवी लीग होणार सुरू; पाहायला भेटणार, रैना, गेल, युवराजसारखे दिग्गज