---Advertisement---

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार? घ्या जाणून सविस्तर

On: शुक्रवार, मार्च 1, 2024 5:34 PM
Team India in ODI World Cup 2023
---Advertisement---

सध्या आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. तर सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत. बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं असून येत्या 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. त्याआधी बीसीसीआयचं मुख्य लक्ष्य आयसीसी टी20 वर्ल्डकप आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.

याबरोबरच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार हे आधीच स्पष्ट केलं आहे. असं असताना इतर 14 खेळाडू कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत संघ कधी घोषित होणार? कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याची खलबतं सुरु आहेत. स्पोर्टतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यासाठी 1 मेपर्यंतची तारीख असेल. त्यानंतर 25 मेपर्यंत 15 सदस्यीय संघात बदल करता येणार आहे.

आयपीएल 2024 नंतर टी20 वर्ल्डकप थरार रंगणार आहे. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळेल. आईपीएल सर्वात यशस्वी ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स संघातील अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते. तर रॉयल चॅलेंजर बंगळुरुच्या 3 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएलमध्ये आपली चमक दाखवावी लागणार आहे. चमक दाखवण्याची संधी साखळी फेरीतच असणार आहे.

दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या यांची नावं जवळपास निश्चित असतील. पण इतर संभाव्य खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमक दाखवली तरच त्यांना संघात स्थान मिळवता येणार आहे. तसेच भारतीय संघाचे साखळी फेरीतील 4 पैकी तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. तर एक सामना लॉडरहिलमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध, दुसरा सामना 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध, तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेशी, शेवटचा सामना 15 जूनला कॅनडाशी होणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 साठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई/युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशक/तुषार देशपांडे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---