---Advertisement---

IPL पाहायला जाणार? जाणून घ्या तिकीट बुकिंगची सोपी स्टेप्स; VIP सीटची किंमत ऐकून थक्क व्हाल!

On: शनिवार, मार्च 21, 2026 8:44 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 चा थरार आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यंदाच्या हंगामाची सुरुवात 28 मार्च रोजी होणार असून उद्घाटनाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्च ते 31 मे दरम्यान पार पडणार आहे. लीग स्टेज 28 मार्च ते 24 मे या कालावधीत होईल आणि एकूण 80 सामने खेळवले जातील. त्यानंतर 26 मे रोजी क्वालिफायर-1, 27 मे रोजी एलिमिनेटर, 29 मे रोजी क्वालिफायर-2 आणि 31 मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे. सध्या स्पर्धेतील पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

टिकिट बुकिंगबाबत बोलायचे झाले तर, 16 मार्चपासून अधिकृतरीत्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. यंदा सर्व 10 फ्रँचायझींनी आपापले अधिकृत तिकिटिंग पार्टनर निश्चित केले आहेत. चाहत्यांना BookMyShow आणि Zomato (डिस्ट्रिक्ट प्लॅटफॉर्म) या अॅप्स/वेबसाइटद्वारे सहज तिकिटे बुक करता येणार आहेत. काही संघांच्या अधिकृत वेबसाइटवरूनही थेट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ऑफलाइन काउंटरवरूनही तिकिटे घेण्याची सोय ठेवण्यात आली आहे. अनेक स्टेडियममध्ये आता QR कोड असलेली ई-तिकिटे (m-ticket) मान्य करण्यात आली आहेत.

तिकिटांच्या किंमतींचा विचार केला तर, सामन्याची मागणी, स्टेडियम आणि सीटच्या प्रकारानुसार दर ठरवले जातात. साधारणपणे 500 रुपयांपासून सुरुवात होऊन 40,000 रुपयांपर्यंत तिकिटांची किंमत जाऊ शकते. सुरुवातीच्या सामन्यांसाठी 500 ते 1500 रुपये, मिड-रेंज सीट्ससाठी 1500 ते 7500 रुपये, प्रीमियम सीट्ससाठी 8000 ते 18,000 रुपये आणि VIP तिकिटांसाठी 19,000 ते 40,000 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांची घोषणा करण्यात आली असून पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---