---Advertisement---

T20 वर्ल्ड कप 2026 नंतर पहिल्यांदाच कधी जाहीर होणार नवी ICC रँकिंग? जाणून घ्या तारीख

On: मंगळवार, मार्च 10, 2026 10:01 PM
---Advertisement---

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) आता संपला आहे. महिनाभर चाललेल्या या थरारानंतर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती आयसीसीच्या नवीन रँकिंगची. ही रँकिंग कधी जाहीर होणार आणि कोणाला फायदा होणार, ते जाणून घेऊया.

टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर बुधवार, 11 मार्च रोजी आयसीसी आपली ताजी रँकिंग प्रसिद्ध करणार आहे. याच दिवसापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पुन्हा सुरू होतील, जिथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

भारतीय खेळाडूंच्या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या रँकिंगवर दिसेल. अभिषेक शर्मा हा युवा फलंदाज आधीच टी-20 रँकिंगमध्ये नंबर 1 वर आहे. सुरुवातीचे काही सामने खराब गेले असले तरी, नंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. त्याचे पहिले स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन (Sanju Samson) फायनलमधील अर्धशतकी खेळीमुळे संजूच्या रँकिंगमध्ये मोठी झेप पाहायला मिळू शकते. गेल्या अपडेटमध्ये तो 25 स्थानांनी वर सरकून 40 व्या क्रमांकावर पोहोचला होता, आता तो अजून प्रगती करेल.

संपूर्ण स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावणारा ईशान किशन सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये वाढ होऊ शकते. तर, भारतीय कर्णधार सूर्या सध्या सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, फायनलमध्ये तो शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या रँकिंगमध्ये किंचित घसरण होण्याची भीती आहे.

फायनलमध्ये संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या तिघांनीही अर्धशतके झळकावून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या शानदार कामगिरीमुळे भारतीय फलंदाजांचे आयसीसी रँकिंगमधील वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---