आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक येथे होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. सध्या फक्त 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत आयपीएलचे वेळापत्रक आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखेनंतरच उर्वरित वेळापत्रक समोर येणार आहे. याआधी सनराईजर्स हैदराबादने एक मोठा बदल केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा सनराईजर्स हैदराबादचा प्रशिक्षक आहे. मात्र तो आयपीएल 2024 च्या हंगामातून ब्रेक घेणार आहे. मात्र तो पुढच्या हंगामात पुन्हा सनराईजर्स हैदराबादशी जोडला जाणार आहे. यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामात जेम्स फ्रँकलिन हे सनरायझर्स हैदराबादचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. तसेच जेम्स फ्रँकलिनचा आयपीएलमधील प्रशिक्षकपदाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे.
याआधी जेम्स फ्रँकलिन 2011 आणि 2012 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. जेम्स फ्रँकलिन सध्या पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. तसेच हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, उमरान मलिक यांच्यासह अनेक वेगवान गोलंदाज आहेत, तर त्यांच्याकडे वानिंदू हसरंगा, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांच्या रूपाने फिरकी गोलंदाज आहेत.
आयपीएल 2022 मध्ये, हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर होते तर गेल्या वेळी ते 10 व्या स्थानावर होते. अशा स्थितीत व्हिटोरी आणि जेम्स फ्रँकलिन यांच्यासमोर हैदराबादची कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. तसेच आयपीएल 2023 च्या लिलावात जाण्यापूर्वीच, हैदराबादने केन विल्यमसनला सोडले होते, ज्याने त्यासाठी आठ हंगाम खेळले होते, तर त्यांनी डेव्हिड वॉर्नरला 2022 मध्येच सोडले होते.
दरम्यान, सध्या हैदराबादचे नेतृत्व एडिन मार्करमकडे आहे. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन हंगामात हैदराबादला फार यश मिळालेलं नाही. 2022 मध्ये हैदराबाद आठव्या तर 2023 मध्ये 10 व्या स्थानावर होते. मात्र मार्करमच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ SA20 स्पर्धेतही खेळतो तेथे सनराईजर्स इस्टर्न केपने 2023 अन् 24 असे सलग दोन हंगाम जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy 2024 : साई किशोरचा पंजा..! मुंबईचा संघ सेमी फायनलमध्ये अडचणीत, अजिंक्य पुन्हा अपयशी
- अनंत-राधिका प्रीवेडिंग! महेंद्रसिंग धोनी मोहिनी, ब्राव्हो आणि साक्षीसोबत खेळला दांडिया, पाहा व्हिडिओ