आयपीएलचा १७ वा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण ऋषभ पंतला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच आयपीएल 2024 मध्ये, सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर असणार आहे. पण त्या आधी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
भारतीय क्रिकेटपट्टू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हा अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता ऋषभ पंतला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी सर्वजण त्याची वाट पाहत आहेत. तसेच दुखापतीमुळे पंतने यापूर्वीच अनेक मोठ्या स्पर्धांना मुकला आहे.
याबरोबरच ऋषभ पंतवर कार अपघातानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पंतला आपला फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 23 मार्चपासून आयपीएल 2024 ची मोहीम सुरू करणार आहे. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अद्याप ऋषभ पंतला तंदुरुस्त घोषित केलेले नाही. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस क्लिअरन्स मिळालेला नाही. पंत अद्याप या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे एनसीए अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पंतला अद्याप दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स समोर मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
https://twitter.com/Rushabhsant/status/1763794241762046236
दरम्यान, ऋषभ पंतला आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने 17 व्या हंगामात ऋषभ पंत संघाचा कर्णधार असेल असे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, पंत या काळात विकेटकीपिंग करणार नाही. त्यापेक्षा पंत संघात फलंदाज म्हणून खेळणार आहे. याबरोबरच ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
- ICC रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम, तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1
- मोहम्मद शमी पूर्वी ‘या’ 7 भारतीय क्रिकेटपटूंनी आजमावलंय राजकारणात नशीब, जाणून घ्या कोण किती काळ टिकलं