आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडणार आहेत.
यावेळी मुंबई इंडियन्स संघ चार सामने खेळणार असून मुंबईचे पहिले दोन सामने अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये होणार आहेत. तसेच संघ पुढील दोन सामने मुंबईतील वानखेडेवरच खेळणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी तिकीट विक्री बाबत एक माहिती सध्या समोर आली आहे. याबाबत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने शुक्रवारी त्यांच्या ट्टिटर हँडलवर सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीची माहिती शेअर करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 24 मार्चला अहमदाबादच्या नेरंद्र मोदी स्टेडियम वरती होणार आहे. त्यानंतर पुढील तीन सामन्यांची तिकिटे चार टप्प्यात विकली जाणार आहेत. याबाबत फ्रँचायझीने या चार टप्प्यांबद्दल माहिती शेअर केली आहे. तसेच पहिला टप्पा 6 मार्चपासून सुरू होणार असून यावेळी तिकीट फक्त SLICE UPI द्वारे उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर फेज 2 च्या तिकिटांची विक्री 9 मार्चपासून सुरू होईल.
????️ ???????????????????????? ???????????????????????? ????
Date is set for the tickets to go live. Make sure you are ready to beat the queue ????
MI Family membership: https://t.co/ClwytlTBJG#OneFamily #MumbaiIndians @sliceit_ pic.twitter.com/OdBqUXkwx5
— Mumbai Indians (@mipaltan) March 1, 2024
या वेळी टप्प्यात, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लू ज्युनियर सदस्य त्यांची तिकिटे खरेदी करू शकणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात 10 मार्चपासून तिकीट बुकिंग सुरू होईल आणि यादरम्यान Mi फॅमिलीचे ब्लू सदस्य त्यांची तिकिटे खरेदी करू शकतील. यानंतर, चौथा टप्पा 13 मार्चपासून सुरू होईल आणि या दरम्यान प्रत्येकासाठी तिकीट बुकिंग सुरू होणार आहे.
???????????????????????????????????? ???????????????????????????? ???????????? ft. Mumbai Indians ????
Click ???? and check out the ???? moments of our players off the field in the MI Camp ????????️#OneFamily #MumbaiIndians https://t.co/poBYzlOXh0
— Mumbai Indians (@mipaltan) February 28, 2024
दरम्यान, मुंबई इंडियन्सने या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली असून या लिंकद्वारे चाहत्यांना ब्लू, गोल्ड, सिल्व्हर किंवा इतर अनेक प्रकारची मेंबरशिप मिळू शकते. यानंतर तिकीट मिळणे सोपे होऊ शकते. तिकीट खरेदी करण्याबाबत इतर माहितीसाठी चाहते मुंबई इंडियन्सच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.
पहिल्या हाफमधील मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक
24 मार्च (सायंकाळी 7.30) – गुजरात टायटन्स, अहमदाबाद
27 मार्च (सायंकाळी 7.30) – सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद
1 एप्रिल (सायंकाळी 7.30) – राजस्थान रॉयल्स, मुंबई
7 एप्रिल (दुपारी 3.30) – दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
महत्वाच्या बातम्या –






