आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्वाचे वेध सुरु झाले आहेत. जेतेपदासाठी 10 संघांनी कंबर देखील कसली आहे. तसेच आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून चेन्नई सुपर किग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्या सामन्याने सुरवात होणार आहे. तर 25 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ घरच्या मैदानावर त्याचा ह्या हंगामातील दुसरा सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी आरसीबीच्या चाहत्यांनसाठी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 25 मार्चला पंजाब किंग्ज विरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. परंतु त्याआधी कर्नाटकची राजधानी मध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे याचा परिणाम हा आगामी आयपीएलच्या सामन्यांवर होण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावर कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (KSCA) पाणी संकटावर चर्चा करून उपाय शोधण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यामुळे KSCA आयपीएल सामन्यांसाठीच्या खेळपट्ट्यांना कसं पाणी पुरवणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
याबरोबरच मीडियाशी बोलताना कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, बैठकीनंतरच या विषयावर कोणतेही वक्तव्य करता येईल. त्याआधी बैठकीपूर्वी या विषयावर कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. आता इथून बंगळुरूच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलले जाते की त्यांच्या घरच्या मैदानात बदल होणार हे पहावे लागणार आहे. तसेच कर्नाटकची राजधानी बंगळुरूवरील पाण्याचे संकट दिवसांदिवस वाढत चालले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मार्चमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठवड्यात यात जास्तच वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जो पाण्याचा टँकर 700 ते 800 रूपयाला मिळत होता तो आता 1500 ते 1800 रूपयापर्यंत पोहचला आहे. ही परिस्थिती बंगळुरू पाणी पुरवठा विभागाने पुढच्या पाच महिने पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असल्याचे सांगुनही उद्भवली आहे.
RCB's home matches likely to be shifted from Bengaluru, due to water scarcity.The city is currently facing a huge water crisis situation.
Vishakapatnam & Kochi are the alternative venues being discussed.#RCB #IPL2024 #kohli #bengaluru pic.twitter.com/G7r6fxUJKT
— Popcorn Coldcoffee Combo (@PcornColdCoffee) March 11, 2024
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आत्तापर्यतच्या आयपीएलच्या इतिहासात त्यांनी एकदाही विजेतेपद पटकावले नाही. तर या संघाने आत्तापर्यत 2009, 2011 आणि 2016 मध्ये आयपीएलचा अतिंम सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
- सात्विक-चिराग जोडीनं जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा, तैवानच्या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव
- WPL 2024 : आरसीबीच्या प्लेऑफ खेळण्याच्या आशा अजूनही कायम, घ्या जाणून कसं आहे गणित