यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली आहे. हे अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अशांपैकीच एक आहे, झारखंडमधील रांचीचा ख्रिस गेल रॉबिन मिंझला गुजरात टायटन्स संघाने ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करून रॉबिनला त्यांच्या संघात घेतले होते.
याआधी आयपीएल 2024 पूर्वी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. खरंतर, संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला 3.6 कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू आहे.
याबरोबरच रॉबिन मिंजच्या वडिलांनी सांगितले आहे की, रॉबिन मिंजच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेले नाही. खरे तर 22 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. तर गुजरात टायटन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. रॉबिन मिन्झ सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.
Robin Minz was riding his Kawasaki superbike when contact with another bike made him lose control. The bike is severely damaged but Robin, according to father Francis, has minor bruises.#RobinMinz #GujaratTitans #IPL #IPL2024 #CricketTwitter pic.twitter.com/4co8InbUF5
— InsideSport (@InsideSportIND) March 3, 2024
दरम्यान, रॉबिन मिन्झ हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू ठरणार आहे, हे विशेष. गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये रॉबिन मिन्झ चमकदार कामगिरी करत आहे. तसेच यंदा मुंबई इंडियन्सने इंग्लंडमध्ये 30 खेळाडूंचे शिबिर आयोजित केले होते. रॉबिन मिन्झचा खेळ पाहिल्यानंतर त्याचाही या शिबिरात समावेश करण्यात आला. लिलावानंतर रॉबिन मिन्झच्या वडिलांनी सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी त्यांनी महेंद्रसिंग धोनीची रांची विमानतळावर भेट घेतली होती. यावेळी, माजी भारतीय कर्णधाराने त्याला सांगितले होते की, जर कोणत्याही संघाने रॉबिन मिन्झला लिलावात खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला नक्कीच संघात घेईल.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy 2024 : साई किशोरचा पंजा..! मुंबईचा संघ सेमी फायनलमध्ये अडचणीत, अजिंक्य पुन्हा अपयशी
- अनंत-राधिका प्रीवेडिंग! महेंद्रसिंग धोनी मोहिनी, ब्राव्हो आणि साक्षीसोबत खेळला दांडिया, पाहा व्हिडिओ