आयपीएल 2024 च्या 61व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज समोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा समान खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थेक्षाना
इम्पॅक्ट प्लेअर्स – अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, अजय मंडल, मुकेश चौधरी
चालू हंगामात चेन्नई आणि राजस्थानचे संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. प्लेऑफच्या आशा बळकट करण्यासाठी सीएसकेला राजस्थानविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकणं आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे सध्या 12 गुण आहेत. सीएसकेला गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून 35 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आज विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावे लागलं आहे. राजस्थान प्लेऑफसाठी तिकीट मिळविण्याच्या मार्गावर आहे. जर आज राजस्थान चेन्नई विरुद्ध जिंकण्यात यशस्वी ठरला, तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ बनतील. कोलकाता नाईट रायडर्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. राजस्थाननं आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. सॅमसन ब्रिगेड 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई आणि राजस्थान आयपीएलमध्ये एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चेन्नईनं 15, तर राजस्थाननं 13 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरच्या खेळाडूला ‘ही’ चूक पडली महागात, BCCI ने ठोठावला दंड; जाणून घ्या
क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय
रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो