---Advertisement---

महेंद्रसिंह धोनी आज करणार निवृत्तीची घोषणा? सीएसकेच्या सोशल मीडिया पोस्टनं खळबळ!

CSK MS Dhoni
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आज आयपीएल 2024 मधील घरच्या मैदानावर त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहे. या सामन्यात त्यांच्यासमोर संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजेच चेन्नई धावांचा पाठलाग करणार आहे.

या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघानं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली. पोस्टद्वारे संघानं चाहत्यांना सामना संपल्यानंतर मैदानावरच थांबण्याची विनंती केली आहे. याचा संबंध चाहते महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत. ही पोस्ट पाहून चेन्नईचे अनेक चाहते भावूकही झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. जर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय होवू शकला नाही, आणि धोनीनं निवृत्ती जाहीर केली, तर घरच्या मैदानावर हा धोनीचा शेवटचा सामना असेल.

सामन्यापूर्वी चेन्नई संघानं सोशल मीडियावर कॅप्शनसह एक पोस्ट जारी केली. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चेन्नईच्या ‘सुपर’ चाहत्यांना मॅचनंतर मैदानावरच थांबण्याची विनंती आहे! तुमच्यासाठी काही खास आहे.” चेन्नईनं ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी याला टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीशी जोडण्यास सुरुवात केली. एका यूजरनं लिहिलं की, “आज मी नक्कीच रडणार आहे.” दुसऱ्या युजरनं धोनीचे काही फोटो शेअर करत लिहिलं, “धन्यवाद.” तर आणखी एका युजरनं, “हा धोनीचा शेवटचा सामना असेल का?”, असा प्रश्न विचारला आहे.

 

महेंद्रसिंह धोनीनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात त्याच्या बॅटमधून अनेक षटकार आणि चौकार निघाले आहेत, ज्यामुळे अनेकदा चाहत्यांचं मनोरंजन देखील झालं. धोनीनं चालू हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 68 ची सरासरी आणि 226.67 च्या स्ट्राइक रेटनं 136 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 11 चौकार आणि 12 षटकार हाणले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईच्या घरच्या मैदानावर राजस्थाननं जिंकला टॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग 11

केकेआरच्या खेळाडूला ‘ही’ चूक पडली महागात, BCCI ने ठोठावला दंड; जाणून घ्या

क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---